.
... (अजित जगताप). सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश ज्या भूमीत झाला आहे. त्या सातारच्या भूमीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने भव्य दिव्य भीम फेस्टिवलचे धुमधडाक्यात आयोजन केले आहे. साताऱ्यातील भीम फेस्टिवलचे हे चौथे वर्ष असून फुले शाहू आंबेडकर विचाराच्या कार्यकर्त्यांसाठी प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक मेजवानी ठरली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई, चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा अध्यक्ष संजय गाडे, गणेश भिसे व विशाल कांबळे, रेखा सकटे यांच्या सहकार्याने अनेक आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत. ज्येष्ठ मार्गदर्शक बबनदादा करडे , अँड . राजेंद्र गलांडे,शशिकांत गंगावणे ,दत्ता सावंत, दादा सातपुते, सतीश कांबळे, सुहास मोरे, प्रशांत उबाळे, अविनाश भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. इतिहासाच्या
सुवर्णपानातही दुर्लक्षित केलेले शिवपुत्र अद्वितीय छत्रपती, स्वराज्यरक्षक
शंभूराजे महाराज यांच्या १४ मे या जयंती दिनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त
जयंती महोत्सव साजरा होत आहे . संपूर्ण महाराष्ट्रातील मनोरंजनाच्या मंचकावर अग्रस्थानी असलेल्या बारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामतीचा
हा मनोरंजनात्मक प्रबोधनाचा कार्यक्रम या भिम फेस्टिवलची आकर्षण ठरले आहे. राजकीय,
सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाची साक्षीदार कवी
दंगलकार नितीन चंदनशिवे याचे काव्यात्मक व्याख्यानाचे पर्व १४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता आहे. सातारा शहरातील महात्मा गांधी मैदान, राजवाडा समोर होणाऱ्या या भीम फेस्टिव्हलचे उद्घाघाटन राज्याचे
उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच प्रतिमा पुजन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि खा. नितीनकाका पाटील करणार
आहेत. सातारा पालकमंत्री तथा राज्य पर्यटनमंत्री ना. शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले, पुनर्वसन मंत्री
ना. मकरंद आबा पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री .ना.जयकुमार गोरे,
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आ. महेश शिंदे, कराड उत्तरचे आ .मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले आणि सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमास विशेष
उपस्थिती म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण
गवई आणि रिपाई राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई साहेब उपस्थित राहणार आहेत. असणार आहेत. सातारा जि.प. उपाध्यक्ष राजुभैय्या भोसले, तसेच सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उप नगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर यांचेसह आजी माजी जिल्हा परिषद,
पंचायत समिती सभपती, सदस्य तसेच नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील
मान्यवरांनाही निमंत्रित केलेले आहे. रिपब्लिकन पक्षाचे सुहास मोरे, अॅड. पायल गाडे हे स्वागताध्यक्ष असतील. कार्यक्रम सुसुत्रबद्ध करण्यासाठी रविंद्र
वायदंडे, सुंदर ओव्हाळ, अनिल धोत्रे, सनी काटे, आशुतोष वाघमोडे, प्रथमेश
भंडारी, आबा मोरे, ऋतुराज चांदणे, दादा सातपुते, चंदा कांबळे, अर्चना बगाडे, नलिनी घाडगे, अविनाश भोसले, अनिल वायदंडे, सुरेश बैले, अजयशेठ
कांबळे, सतिश कांबळे, दत्तात्रय सावंत, रोहित भिसे, किरण बोभाटे, प्रशांत
किर्तीकुडाव, उल्हास गायकवाड, सुर्यकांत जाधव, प्रतिक गाडे व इतर पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. यापूर्वी साताऱ्यातील भीम फेस्टिवल मध्ये भीमसेन जॉली मोरे व सीमा पाटील, शीतल साठे व सचिन माळी, भीम गायिका कडूबाई खरात आणि आता चौथ्या वर्षी मनोरंजनाचा निखळ ग्रामीण भाषेतील चांडाळ चौकडी करामती सातारकरांसाठी सज्ज झाले आहेत. आईने उन्हाळ्यात मनोरंजनाचा गारवा पाहण्यासाठी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले आहे . त्यामुळे अनेकांनी आतापासूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाला धन्यवाद दिले आहेत.
..................... .........
.. फोटो साताऱ्यातील भिम फेस्टिवलची माहिती देताना मान्यवर (छाया-- निनाद जगताप , सायगाव)


