(मुरुम प्रतिनिधी)
दिनांक 05 ते 14 मे 2026 दरम्यान चालु असलेल्या 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांच्या वतीने वार्षिक प्रशिक्षण शिबिर श्री तुळजा भवानी सैनिकी शाळा तुळजापुर येथे संपन्न झाला.लातूर बटालियन चे जवळपास 435 एनसीसी चे कॅडेट सहभागी झाले होते.या प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवारी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी कँप कमांडंट कर्नल संतोष नवगण व डेप्युटी कँप कमांडंट वाय बी सिंह होते.
समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना कर्नल संतोष नवगण यांनी कॅडेटसना चरित्र, नेतृत्व ,देशभक्ती ,शिस्त , एकता ,अनुशासन, स्वच्छता,आदी गुणांचा अंगीकार करून सामाजिक व राष्ट्राच्या उभारणी मध्ये योगदान दयावे असे संबोधित केले.या कँपमध्ये अनेक विषयावर व्याख्यान घेण्यात आले प्रामुख्याने पाणी,वीज,अन्न बचत तसेच सायबर क्राईम,आपत्ती व्यवस्थापन,ट्रॅफिक नियमांचे पालन,करिअर मार्गदर्शन, आधुनिक शेती, व्यक्तिमत्व विकास या विषयावरती विशेष भर देण्यात आला या सर्व बाबीचे कॅडेटसनी आपल्या गावात,शाळेत,महाविद्यालयातुन समाजात जाऊन जनजागृती करावी असे आव्हान कर्नल संतोष नवगण यांनी केले.दहा दिवसाच्या या कँपमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन व थल सैनिक कॅडेटसची निवड करण्यात आली.या कँपमध्ये झालेल्या विविध उपक्रमात अति विशिष्ट कार्य केलेल्या कॅडेसटना प्रमाणपत्र,मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यामध्ये बेस्ट फायरर,बेस्ट पायलट,गार्ड ऑफ ऑनर,व्हॉलीबॉल,टेबल ड्रिल,भाषण,प्रश्नमंजुषा,हार्डवर्क टिम,कँप सिनिअर यांचा गौरव करण्यात आला.कँप दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध शाळा व महाविद्यालयातील मुले व मुली यांनी सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांना वाव देऊन उत्कृष्ट नृत्य,गायन,वादन,मिमिक्री,मूक अभिनयाचे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले व आभार कुंभार व्ही बी यांनी केले . कँपच्या यशस्वीतेसाठी सुभेदार मेजर शंभू सिंग,कॅप्टन डॉ चिट्टमपल्ले ज्ञानेश्वर,लेफ्टनंट पावडे हरिभाऊ,घोरपडे अमरसिंह,राजोळे सचिन संतोष पाटील,हरेंदर सिंह देशराज सिंह, बाजीराव पाटील,संजय चिकणे,सुनिल काळे,संभाजी शिंदे व हेडक्लार्क घोगरे बी व्ही, पवार,आर आर तसेच सर्व जेसीओ व एनसीओ , बटालियनचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
