आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून ऐतिहासिक भोजलिंग गडाला भेट; गड परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असणार


दहिवडी प्रतिनिधी:जयराम शिंदे

कसब्याचे लोकप्रिय आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या भोजलिंग गडाला सदिच्छा भेट दिली. गडावर पोहोचल्यानंतर त्यांनी भोजलिंग देवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि परिसराची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक नागरिक, भाविक आणि गडप्रेमींशी संवाद साधत गडाच्या विविध समस्या जाणून घेतल्या तालुक्यातून विविध भागातील आलेल्या कार्यकर्ते व आमदार प्रेमी यांच्या समस्या अडचणी ऐकून घेऊन भाऊंनी गडाची स्वच्छता पाण्याची व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले यावेळी भोजलिंग गड हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून आपल्या संस्कृतीचे आणि इतिहासाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. या पवित्र जागेचा विकास करणे आणि येथील पर्यटनाला चालना देणे हे आपले कर्तव्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आमदार धंगेकर गडावर येणार असल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ पानवन, वळई , जांभू ळणी वरकुटे मलवडी व पंचक्रोशीतील अधिकारी पदाधिकारी आटपाडी, खटाव माण , सांगोला , फलटण माळशिरस येथील कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पहार घालून जोरदार स्वागत केले. धंगेकर यांच्या या दौऱ्यामुळे गडाच्या प्रलंबित विकासकामांना आता गती मिळेल, अशी आशा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.या भेटीप्रसंगी. आदर्श विद्यार्थी प्रिय शिक्षक दैवत काळेल सर, माजी जिल्हापरिषद कृषी सभापती शिवाजीराव शिंदे अप्पासाहेब करचे , बाळासाहेब आटपाडकर, जवाहर काळेल, मामासाहेब शिंदे, पै विजय गळवे, उमेश काळेल, 

 अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.