औंध(वार्ताहर):-
निमसोड ता.खटाव येथे हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष व उद्योजक रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे नगरसेवक हरिष भांदिर्गे यांच्या मार्फत प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायत निमसोड यांचेकडून कोरोना रोगाचा मुकाबला करण्यासाठी व प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथीक आर्सेनिक अल्बम या गोळयांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की, समाजावर आलेले हे संकट परतवून लावण्यासाठी प्रत्येकाने संघटीतपणे याचा मुकाबला करणे गरजेचे आहे.
नागरिकांमध्ये जनजागृती करणे,आरोग्यदायी सवयी ,स्वच्छता तसेच कोरोनापासून कसा बचाव करावा याविषयी ग्रामीण भागात कार्य करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने संकटाचा मुकाबला करत जगण्याची गरज आहे. नगरसेवक हरिष भांदिर्गे यांनी गेल्या तीन महिन्यांन पासुन त्यांच्या मतदार संघात अतिशय कौतुकास्पद काम चालु आहे. त्यांनी केलेले सहकार्य व मदत निमसोड ग्रामस्थ कधी ही विसरणार नाहीत असे सांगून त्यांनी हरिष भांदिर्गे यांचा कार्याचे कौतुक केले.
यावेळी रणजितसिंह देशमुख यांनी हरणाई उद्योग समूहामार्फत निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी ,ग्रामपंचायत कर्मचारी यांना फेस शिल्डचे वाटप केले.अभिजीत देशमुख ,उपसरपंच विनायकराव देशमुख ,निलेश घार्गे,अजित देशमुख, अमित देशमुख,गजानन सुतार, गोरख कदम,गोविंद पोतदार, कृष्णत घाडगे ,गणेश जैजाळ,मनोज देशमुख,नामदेव मोरे,विनोद घाडगे निखिल चौधरी,सागर किवडे ,ग्रामस्थ उपस्थित होते.