गोंदवले...
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे
ही वाढ लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास आगामी काळातील उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गोंदवले बुद्रुक (ता.माण) येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर समितीच्या रुग्णालयाची व भक्त निवासांची पाहणी दि.7 जून रोजी केली.
तसेच कोरोना प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांचे विलगिकरण करता यावे म्हणून येथील भक्तनिवासांचीही पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे,तहसिलदार बी एस माने,तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर,मंदिर समितीचे विश्वस्त तसेच अंगराज कट्टे,प्रवीणभोसले,मंडलाधिकारी श्रीकर्णे,गावतलाठी इनामदार,ग्रामविकास अधिकारी अमोल पवार उपस्थित होते.
गोंदवले येथील ब्रम्हचैतन्य रुग्णालयात कोविड उपचार केंद्र सुरु केल्यास गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी येथे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येऊ नये. असा नाराजी चा सुर ऐकायला मिळत आहे.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी शासन खासगी व देवस्थान ची सुसज्ज रुगालये कोविड केंद्र म्हणून वापरासाठी घेत आहेत.
तसेच येथील रुग्णालयात बाहेरहून तज्ञ डॉक्टर येतात. यामुळे येथील नागरिक कोविड उपचार केंद्रा सुरु बाबत नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान समाधी मंदिर व भक्तनिवास हे लोकवस्तीत आहे.तसेच श्री चैतन्य रुग्णालयात तज्ञ डॉक्टर वेळेत उपलब्ध होण्यात अडचणी आहेत.
शिवाय या रुग्णालयात अत्यावश्यक व अति दक्षतेच्या सुविधा नाहीत.त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांसाठी वापर करण्याबाबत समाधी मंदिर समिती व ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आह
