नाभिक समाज आक्रमक,.....नाहीतर जलसमाधी घेवू...





मेढा(धनंजय गोरे):-


●सलून सुरु करा, नाहीतर जलसमाधी घेवू

●महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सलूनची दुकाने सुरू करा अथवा पारंपारिक सलून व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजाला आर्थिक पॅकेज जाहीर करा अन्यथा उपाशी मरण्यापेक्षा आम्ही येणाऱ्या मान्सूनच्या पहिल्या पुरात जलसमाधी का घेऊ नये ?अन्नत्याग का करू नये? अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने सातारा जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी जिल्हाधिकारी व  जिल्हा पोलीस यांना दिले. मुख्यमंत्री यांना इमेल केले.             .
        नाभिक महामंडळाचे माजी सचिव  संतोष साळुंके,  उपाध्यक्ष जीवन मसुरकर ,सचिव अजित काशीद सातारा तालुका कार्याध्यक्ष बंटी राजे काशीद, संतोष काशीद यावेळी उपस्थित होते या निवेदनामध्ये  असे म्हंटले आहे की सातारा जिल्ह्यासह राज्यातील सलून दुकाने व ब्युटी पार्लरचे दुकाने तातडीने सुरू करावी अन्यथा पारंपारिक सलून व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजावर उपासमारीची वेळ येणार हे निश्चित आहे. शासन व प्रशासन यांनी दिलेल्या नियम व अटी नुसार सलून व्यवसायिकांनी प्रामाणिक काम केले त्यांच्यामुळे कोठेही कोरोना संसर्ग झालेला नाही. त्यामुळे येत्या आठ जून पासून  सलुन व्यवसाय सुरू करावा अन्यथा पारंपारीक सलुन व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाज्यातील प्रत्येक कुटंबाला प्रति महिना पाच हजार प्रमाणे याप्रमाणे तिन महिन्याचे एकूण १५ हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करावेत, प्रत्येक सलुन व्यवसायीकाला, ५० लाखांचे विमा संरक्षण, तसेच व्यवसाय करताना स्वतः बरोबरच ग्राहकाच्या संरक्षणासाठी लागणारे पी.पी.ई कीट, मास्क व सॅनीटायझर, फेशशिल्ड  अशा स्वरूपाचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.
     त्याच बरोबर येत्या आठ जून पर्यंत याबाबत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आम्ही उपाशी मरण्यापेक्षा येणाऱ्या मान्सूनच्या पाहिल्या पाहिल्या पुरात का जलसमाधी घेवू नये? अन्नत्याग का करू नये? स्वतःला उलटे का लटकवून घेवू नये असा स्पष्ट उल्लेख करून आमच्या पुढे जगणे अथवा मरणे हाच  पर्याय राहणार आहे. त्यामुळे होणाऱ्या परीणामाला शासन च जबाबदार असेल.
लॉक डाऊनच्या अगोदर सर्वात प्रारंभी सलुन व्यवसायीकांनी स्वयंस्फूतीने सलुन व्यवसाय बंद केला, लॉक डाऊनच्या अंतिम टप्यातही सर्वात अखेरीस सलुन व्यवसायिकांना परवानगी मिळाली. ती ही हातावर मोजण्या इतपत नऊ दिवस त्यानंतर बंदीचे आदेश आले.
      व्यवसाय सुरू झाला म्हणून अगोदरच घरात खायला काही शिल्लक नसताना हात उसने, फंड, मिळेल तेथून किमान दहा ते २५ हजार रूपयांचे सलुन व्यावसायिकांनी कर्ज काढले शासनाच्या  नियम व अटी नुसार व्यवसाय सुरू केला. मात्र अचानक सलुन बंदच्या निर्णयामुळे व्यावसायिकांची दुष्काळात तेरावा महिना अवस्था झाली असून आर्थिक आरोग्य धोक्यात आले आहे. त्यात उदरनिरवाहासाठी दुसरा पर्याय नाही.९० टक्के लोकांना शेती नाही आणि दुकाने भाडोत्री , त्यामुळे भाडे, वीजबिल , घरचा खर्च, औषधाचा खर्च, शैक्षणिक वर्षाचा मुलांचा खर्च त्यामुळे पुर्णपणे नाभिक समाज व्यवसाय बंदमुळे अडचणीत आलेला आहे. आजारी व ५५ वर्षा पेक्षा जास्त असलेला सलुन कारागीराला रोगाच्या भितीमुळे मुळे कामबंद त्यांची तर अवस्था खराबच त्यांनाही मानधन सुरू करण्याची गरज आहे.
       त्यामुळे एक नव्हे तर अनेक अडचणीच्या विळख्यात  नाभिक  समाज सापडल्याने आंदोलनच्या भूमिकेत आहे. त्यामुळे वेळीच निर्णय घेवून मार्ग काढावा अशी मागणी जोर धरत आहे. राज्याध्यक्ष कल्याणराव दळे , जेष्ठ नेते भाऊ दळवी, बापूराव काशिद , अशोक सुर्यवंशी, चंद्रकांत जगताप,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव मर्दाने  यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच महामंडळाचे पदाधिकारी विठठल महाराज गायकवाड, सुरेश पवार, सदाभाऊ सपकाळ, किशोर काशिद,भानुदास वास्के, अंबादास दळवी,  प्रकाश वास्के, महेश जाधव, संतोष सपकाळ, पांडूरंग राऊत, प्रदीप काळे, बाळासाहेब पवार, सर्व तालुकाध्यक्ष, शहरप्रमुख  व पदाधिकारी पुढील कार्यवाही नेमका मार्ग कसा काढायचा यासाठी या सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.
     
       तामिळनाडू व दिल्ली सरकारने निर्णय घेवून त्या राज्यात सलुन व्यवसाय सुरू केलेला आहे त्याम प्रमाणे महाराष्ट्रात सुरू करावा अन्यथा कर्नाटक राज्याप्रमाणे आर्थिक पॅकेज नाभिक कटुंबाना जाहीर करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन हे निश्चित..
    विजय सपकाळ जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ