दहिवडी- प्रतिनिधी :
माण तालुक्यातील वडगाव मधील दडसवाडा येथे पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९५व्या जयंती निमित्त डिजीटल वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये मोठा गट प्रथम क्रमांक ओंकार दडस द्वितीय क्रमांक अमृता दडस तृतीय क्रमांक ऋतुजा दडस तसेच लहान गटातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस समाधान दडस सर्व सहभागी स्पर्धेकांच सत्कार व सन्मान करण्यात आला. सोशल अंतर नियमाचे पालन करुन बक्षीस वितरनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपस्थित शरद दडस रासप विद्यार्थी आघाडी माण तालुका अध्यक्ष ,राहुल महादेव दडस युवा नेते,
प्रकाश अंकुश दडस कार्यक्रमाचे अध्यक्ष चद्रकांत दडस उपसरपंच होते तर सुत्रसंचालन दादासो दडस यांनी केले. हरिबा दडस(सर)यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी अहिल्या युवा मंचचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी
दडसवाडा ( ता माण ) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयती साजरी करताना