गरीबाचा डॉक्टर,#हितेंद्र माने.

  " प्रथम पुण्यस्मरण -21 एप्रिल 2020"
  . #विस्मरणातील चेहरा#


       गरीबाचा डॉक्टर,
          हितेंद्र माने.
म्हसवड मध्ये साधारण 1988 सालात प्रथम रक्त लघवी तपासण्याची लॅबरोटरी हितेंद्र माने यांनी सुरू केली .त्यांचा जन्म एका सधन शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे वडील ज्योतिष प्रवीण होते त्यांनी स्वतः ज्योतिषाचा अभ्यास केला होता.
बीएस्सी बीएड. डिएम एल.टी. शिक्षण घेतले होते. काही काळ शिक्षक होते.
मुळ गाव रहिमतपुर पण व्यवसायाच्या निमित्ताने म्हसवड मध्ये आले आणि म्हसवडकर बनले.
दुदैवाने ते आज हयात नाहीत. पण जे त्यांना भेटले ,त्यांच्या काळजातच हा माणूस घूसलेला आहे.
म्हसवड परिसरात दवाखाने हातावर मोजणे इतके. स्पेशालिस्ट डॉक्टर नव्हते.
या काळामध्ये परिसरात आसपासच्या गावांमध्ये रक्त लघवी यांची तपासणी करण्याची सोय नव्हती .
या काळात या माणसानं म्हसवड या दुर्गम आणि दुष्काळी भागात पेथॉलॉजीकल लेबरोटरी सुरू करण्याचं धाडस केलं. आमच्या घराशेजारी च १५ वर्षे काढली, याकाळात मला ही एक सर्वगुणसंपन्न मित्र मिळाला होता. कारण ते फोटोग्राफी करत यामुळे खरे तर आम्ही मित्र झालो. मी पण काही काळ फोटोग्राफी करत होतो.
आणि दुसरे म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग चे टिचर होते. मी १९९६ मध्ये हा कोर्स केला होता.
पहिली काही वर्ष अगदी बेताची गेली. दिवसभरात एखाद दुसरे पेशंट यायचा.
मात्र हळूहळू जम बसत गेला आणि पुढे या लॅबमध्ये सगळ्या तपासण्या होऊ लागल्या.
या नंतर या माणसानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलं आणि ते  करीत असतानाच त्यांनी शेती मध्ये नवीन प्रयोग केला . सेंद्रिय शेती हा प्रयोग
या परिसरामध्ये सुरू केला .
त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि यानंतर त्यांनी चेन्नईतल्या पंचगव्य शिक्षण देणाऱ्या संस्थेतून पंचगव्य उपचार ही पदवी मिळवली.
येथूनच या माणसाने कमाल केली. म्हसवड परिसरामध्ये हा माणूस देवदूत म्हणून प्रसिद्ध झाला.
पुणे, मुंबई, बेंगलोर,चेन्नई,कलकत्ता, दमण,दिव,बडोदा अशा वेगवेगळ्या शहरातून रुग्ण त्यांच्याकडे येऊ लागले. ज्या रुग्णांना मोठ्या दवाखान्यातून रिजेक्ट केलेला आहे .
या रुग्णांना  हे डॉक्टर हितेंद्र माने उपचार करायचे आणि चक्क ते लोक बरे व्हायचे.  पेशंट जे मरणाच्या दारात होते ते चालू फिरू लागलेले मी पाहिले आहेत. मी काही लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत.
विशेषता कॅन्सर मधुमेह अशा दुर्धर आजारांनी त्रासलेले लोक ठणठणीत बरे झाले.  आणि काही पेशंट तर मेले म्हणून  काही तासात जातील असे बरे झाले होते. असं हे काम करणारा माणूस आज आपल्यामध्ये नाही या माणसानं अगदी थोड्याच काळामध्ये खूप मोठे समाजसेवेचे काम केलं .
आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये त्यांचा मोठा मित्र परिवार होता. मोठी गो शाळा सुरु करण्याचे त्यांचे स्वप्न होते. अखेर ते राहुन गेले.
ग्रामीण भागातल्या तरुणांना एकत्र करून सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिलं.
गाईचे पालन करण्यासाठी गायी वाढवण्यासाठी मदत केली.
हे करत असताना  गो विज्ञान संस्थेने त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला. बी.एससी डिएम एल.टी शिक्षण झालेला हा मनुष्य म्हसवड परिसरामध्ये डॉक्टर माने या नावाने प्रसिद्ध होता.
पण निसर्गाला आणि दैवाला हे मान्य नसावं अचानकच हृदयविकाराचा झटका आला दवाखान्यात नेई पर्यंत च ते गतप्राण झाले.
त्यांच्या जाण्यामुळे म्हसवड परिसरातील अत्यंत गरीबाचा डॉक्टर म्हणून नावलौकिक असणारा एक देवदूत निघून गेला.
याचा फटका म्हसवडच्या गोरगरीब जनतेला बसला आहे. पण अजून देखील गरीब आणि कष्टकरी कुटुंबाच्या घरात एकदातरी त्यांचे नाव आदर्श माणूस म्हणून घेतलं जातं ,असा हा माणूस दिसायला अगदी सडपातळ ,चेहरा देखणा ,साधारण सावळा रंग, चेहऱ्यावर कमालीची गुढता,आणि मितभाषी फारसा कुणाशी बोलताना दिसत नसत.
पण या माणसाचा अभ्यास प्रचंड होता धर्म शास्त्र , ज्योतिष ,आरोग्य इत्यादी विषयांमध्ये ते निष्णात होते.
संमोहन उपचार  पण हे पण ते शिकले आणि आम्ही सोबतच कोल्हापूरमध्ये डॉक्टर खानापुरे यांच्याकडे संमोहन उपचार हा कोर्स केला होता.
कुठलाही पेशंट त्यांच्याकडे गेला की ते सांगायचे तुला काय झालं नाही आणि पेशंट लगेच बरा व्हायचा जणू त्यांच्या शब्दात जादू होती अतिशय कमी खर्चामध्ये लोकांना ते आरोग्य सुविधा पुरवत गोशाळेसाठी दान देणं मसवड परिसरामध्ये येणाऱ्या तीन प्रसादासाठी आर्थिक मदत करणे धनधान्याची दान करणं, याचबरोबर म्हसवड मधून निघणाऱ्या दिंडीला जेवण देत. आरोग्य सेवा देण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करणे रक्तदान शिबीर घेणे लघवी रक्त तपासण्याची मोफत शिबिरे घेणे नेत्ररोग हृदयविकार मधुमेह यांच्या मार्गदर्शनाची शिबिरे घेणे याचबरोबर गोमूत्र उपचार व पंचगव्य उपचार याच्या माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं असं बहुअंगी काम त्यांनी केलं आणि अगदी वयाच्या पन्नासाव्या वर्षी ते गतप्राण झाले दोन मुलांनी पत्नी यांना यांच्या खांद्यावर मात्र संसाराचा बोजा पडला .
अचानक त्यांना आलेला हा मृत्यू म्हणजे गौडबंगाल होतं पण शेवटपर्यंत हे गुलदस्त्यातच राहिले.
ते हयात नाहीत मात्र म्हसवड करांच्या प्रत्येकाच्या स्मरणात मात्र आहेत..

लेखन -विजय टाकणे.