(मुरुम प्रतिनिधी) दि .09 ऑगस्ट 2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट सोनाली बिराजदार ची मुंबई पोलीस पदी निवड तसेच कॅडेट नेताजी पवार महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये निवड झाली.हा निकाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला यामध्ये महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे या वर्षी एकुण सहा कॅडेट पोलीस,भारतीय सैन्यदल आठ व इतर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात भरती झाले आहेत ही यशाची परंपरा कायम राखण्यात कॅडेटस यशस्वी ठरले.या यशिस्वेतेबद्दल प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी दोघांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.या सत्कार प्रसंगी प्राचार्यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सोनाली चे भरभरून कौतुक केले तिने महाविद्यालया तर्फे विद्यापीठात शुटिंग स्पर्धेत मध्ये सुवर्ण पदक प्राप्त करून छत्रपती संभाजी नगरच्या विद्यापीठाचे नेतृत्व पण केले होते तसेच एनसीसी मध्ये ऑल इंडिया शुटिंग स्पर्धेत, थल सैनिक कँप इंटर ग्रुप कंपाटिशन पर्यंत सहभाग घेऊन मराठवाड्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला होता आज ती मुंबई पोलीस मध्ये भरती झाली हे तिच्या कष्टाचे , मेहनीतीचे , आत्मविश्वासाचे द्योतक आहे तसेच नेताजी पवार हा नुकताच प्रशिक्षण पुर्ण करून आला ग्रामीण भागातुन कष्टकरी,शेतकऱ्याचा मुलगा जिदीने महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये भरती झाला.कॅडेटसनी केवळ पोलीस,सैन्यदलात जाण्याचे स्वप्न तर बाळगावेच पण एनसीसी सी प्रमाणपत्र पास झाल्या नंतर रेल्वे पोलीस, एमएसएफ,सीआरपीएफ, आसाम रायफलस,बीएसएफ एलआयसी, खाजगी कंपन्या तसेच केंद्र शासनानी वेगवेगळ्या क्षेत्रात एनसीसी साठी विशेष संधी उपलब्ध करून दिल्या आहेत याचा फायदा कॅडेटसनी घ्यावा असे आव्हान त्यांनी केले .या सत्कार समयी डॉ विनोद देवरकर ,डॉ पद्माकर पिटले कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले , प्राध्यापक, कॅडेट्स उपस्थित होते .
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.