मायणी येथे ऑगस्ट क्रांती दिनी दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन -
![]() |
| दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करताना जि. प.सदस्य सूरज पाटील,विलास सोमदे व मान्यवर). |
मायणी (प्रतिनिधी-) --
९ऑगस्ट या क्रांतिदिनी मायणी येथील गांधी मैदानावर असलेल्या दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतिस्तंभास जिल्हा परिषद सदस्य सूरज पाटील व सकल मराठा सेवक विलास सोमदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर सूरज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.डॉ.विकास देशमुख,दीपक कणसे,रामभाऊ सोमदे, कृष्णात सोमदे,प्रकाश कणसे,पांडुरंग तारळेकर,सुदाम भिसे,जनार्दन देशमुख ,अरुणराव चोथे, द. ग.माने,विराज कणसे यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीस्तंभास पुष्पहार अर्पण केला व सर्वांनी भारतमाताकी जय,वंदे मातरम् अशा घोषणा देऊन अभिवादन केले. -
