आदिवासी सन्मान दिवस” व “बहुजन चळवळ प्रेरणा दिन समारोह”* उत्साहात साजरा होणार



मुंबई, दि. ८ ऑगस्ट २०२६ :

बहुजन साहित्य कला अकादमी, बी.आर.एस.पी., बी.आर.व्हि.एम. तसेच इतर आघाड्यांच्या संयुक्त विद्यमाने “आदिवासी सन्मान दिवस” आणि बहुजन संघर्ष नायक, संविधान तज्ञ *ॲड. (डॉ.) सुरेश माने साहेब* यांच्या जन्मदिनानिमित्त “बहुजन चळवळ प्रेरणा दिन समारोह" आयोजित करण्यात आला आहे.


हा कार्यक्रम सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता, मराठी पत्रकार संघ, दुसरा मजला, आझाद मैदान, मुंबई महानगरपालिका कार्यालयासमोर, मुंबई येथे होणार आहे.


या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती ॲड. (डॉ.) सुरेश माने साहेब असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. भालचंद्र मुणगेकर (माजी खासदार, माजी कुलगुरू – मुंबई विद्यापीठ) राहणार आहेत.


कार्यक्रमाचे उद्घाटन मा. संदीप चव्हाण (संपादक व अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मा. कपिल पाटील (माजी शिक्षक आमदार, संस्थापक अध्यक्ष – छात्र भारती) तसेच मा. बाबुराव माने (माजी आमदार, चर्मकार नेते) उपस्थित राहणार आहेत.


या कार्यक्रमामध्ये बहुजन चळवळ, संविधान, सामाजिक न्याय, समता आणि वंचित समाजाच्या प्रश्नांवर वैचारिक चर्चा होणार असून साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, विचारवंत, कलावंत, पत्रकार आणि बहुजन चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


बहुजन समाजाच्या संघर्षाला आणि परिवर्तनवादी विचारांना नवी प्रेरणा देणारा हा समारोह ठरणार असून मुंबईतील नागरिकांनी व बहुजन चळवळीतील सर्व सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा मुंबई प्रदेश अध्यक्ष BRSP श्री. दिपक मंगेश चौगुले यांनी केले आहे.


जाहीर निमंत्रण

मोठ्या संख्येने सहभागी व्हा!


निमंत्रक :

*दिपक मंगेश चौगुले*

मुंबई प्रदेश अध्यक्ष – BRSP

संपर्क 9769655504