जावळीत शैक्षणिक पॅटर्नसाठी क्रांतीची नवी दिशा.

 


(अजित जगताप)

 करहर दिनांक शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो येईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगून ठेवले आहे. आज जावळी तालुक्यात मातब्बर मंडळींनी शैक्षणिक क्रांतीच्या जोरावर आपला ठसा राज्यात उमटवला आहे. हाच आदर्श घेऊन आता जावळीत शैक्षणिक पॅटर्नसाठी जावळीकरांची क्रांतीची नवी दिशा ठरवू लागलेली आहे.

    केंद्रीय  व महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक विद्यार्थी धडपडत असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यात आता अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक नवी पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गुणवत्ता वाढीसाठी कोणतीही जादूची कांडी नसून अभ्यास हाच एकमेव मार्ग आहे. या मार्गावर कसे जायचे? याचे योग्य व अनुभवातून ज्यांनी यश मिळवले आहे. असे यशवंत अधिकारी वर्ग मार्गदर्शन करणार आहेत. राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेचे पदाधिकारी व सायघरचे सुपुत्र आर के धनावडे, नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व सलपाने गावचे सुपुत्र

ओंकार पवार यांच्या समवेत माहिती अधिकाराचे लेखक डॉ. विजय दिघे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा विधायक उपक्रम राबवला जाणार आहे.

 जावळी तालुक्यात धरण शेतजमिनीवर आणि भूमिपुत्र जावळीकर माळरानावर अशी अवस्था झाली आहे. आता तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे मानून आता जावळीकरांनीच स्वतःच्या प्रगती करण्यासाठी मार्ग निवडला आहे. राजकारणामध्ये फार तर कार्यकर्ता होऊ शकतो. छोटे मोठे ठेकेदार, लघु उद्योजक बनू शकतो. परंतु, एक पिढी घडवणारे अधिकारी बनवण्यासाठी जावळीकर सज्ज झाले आहेत. जावली तालुका युवा प्रतिष्ठान संघटनेने ही जबाबदारी स्वीकारली आहे.

डोंगराळ भौगोलिक परिस्थिती आणि शेतीसाठी मर्यादित साधनसंपत्ती असूनही जावली तालुक्यातील अनेक कुटुंबांनी शिक्षणालाच प्रगतीचा मुख्य मार्ग मानला. त्यातूनच सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला “जावली पॅटर्न” उदयास आला आहे. जावळी तालुक्यातील ग्रामीण भागातील गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांची खाण बनणाऱ्या जावळीमध्ये खऱ्या अर्थाने बुद्धिमत्तेचे उत्खनन होणार आहे. त्यातून नवनिर्माण केल्याशिवाय जावळीकर स्वस्त बसणार नाही. त्यासाठीच आता मार्गदर्शन शिबिर व स्पर्धा परीक्षा तयारी सुरू झालेली आहे.

जावळी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते हॉटेल व्यवसायिक डॉक्टर विजय दिघे यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक जावली करांनी आपल्या गावातील हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांचे आयुष्य संपर्क साधून त्याची माहिती द्यावी असे त्यांनी सांगितले आहे. आता खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांतीची पहाट उजाडणार असून यातून संपूर्ण जावळी प्रकाशमान होणार आहे. हे मात्र निश्चित घडणार आहे. असा आत्मविश्वास विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या जावळीकरांनी मनोगत व्यक्त केले आहे.


_________________________________


फोटो -- जावळी युवा प्रतिष्ठानच्या वतीने तीन सुपुत्रांची धडपड...