मुरुम, ता. उमरगा,
(प्रतिनिधी) : मानवता हाच खरा धर्म असा विचार अभंगातून मांडणारे संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती जिल्हा परिषद प्रशालेत रविवारी (ता. ८) रोजी साजरी करण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या तुकारामाची अभंगवाणी या ग्रंथाचे लेखनकर्ते राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रवीण अंबुसे, अप्पू साखरे, सचिन अंबुसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विजयकुमार देशमाने म्हणाले की, नवीन पिढीला चांगल्या संस्कारांची गरज आहे. संताजींचे विचार, त्यांचे ग्रंथ आजच्या तरुणांनी आवडीने वाचले पाहिजेत. संत तुकाराम महाराजांच्या एका टाळकऱ्यापैकी एक टाळकरी म्हणजे संताजी जगनाडे महाराज होते. त्यांनी प्रतिकुल काळात स्वतःच्या चाणाक्ष बुध्दीमत्तेच्या जोरावर त्यावेळी तुकाराम महाराजांचे अभंग मुखोदगद करुन तुकाराम महाराजांची अभंगगाथा त्यांनी लिहीली. त्यांच्या विचाराचे स्मरण करणे काळाची गरजेचे आहे. मानवता हाच खरा धर्म असा संदेश त्यांनी त्यावेळी दिला होता. शंकर अंबुसे, पप्पू मुळजकर, संदीप अंबुसे, सदाशिव अंबुसे, सहशिक्षक राजू पवार, उत्कृष्ट फलक लेखन कलाशिक्षक नागनाथ कामशेट्टी, श्रीमती परीट, धनराज इरकल आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवाजी कवाळे यांनी मानले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्रशालेत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालताना विजयकुमार देशमाने व अन्य.