*पळशी येथील दारूबंदी ठरावाच्या अनुषंगाने म्हसवड पोलीसांची दारू विक्री वाहतूक अनुषंगाने धडक कारवाई त्याचबरोबर भालवडी येथील कल्याण मटका चालवणाऱ्या आरोपीवर छापा टाकून कारवाई
1 लाख 53 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर कारवाई
*सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफसह अवैध धंद्यांच्या अनुषंगाने सातत्यपूर्ण प्रभावी कारवाई*
हकीकत
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारू विक्री बंद व्हावी व त्याचे समूळ नष्टीकरण व्हावे या उद्देशाने त्याचबरोबर पळशी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरवाच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्या लोकांवर प्रभावीपणे कारवाई करण्याच्या उद्देशाने गोपनीय माहिती घेतली असता पळशी येथील काही इसम अवैध दारू विक्री व वाहतूक अजूनही करत असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याचे अनुषंगाने पळशी येथे पेट्रोलिंग करत असताना पळशी ते मार्डी रोड वरून पळशी येथील नदीच्या पुलावर एक मोटरसायकल चालक त्याच्या गाडीला पिशवी लावून भरधाव वेगात जात असताना त्याला थांबण्याचा इशारा केला असता.
तो न थांबल्यामुळे तसेच आणखीन जोरात गाडी पळवू लागल्यामुळे त्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करून त्यास पकडून त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता त्यामध्ये देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. *त्याला त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव धनाजी मुरलीधर गुजले वय 35 वर्ष, राहणार पळशी तालुका माण जिल्हा सातारा असे सांगितले
तो पळशी गावामध्ये अवैधरित्या दारू विक्री करण्याकरिता दारूच्या बाटल्या घेऊन जात असल्याबाबत निष्पन्न झाल्याने त्याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अ आणि 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 1 लाख 53 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर भालवडी येथील सनी नंदकुमार बनसोडे हा बेकायदा बिगर परवाना आकड्यावर पैसे म्हणून स्वीकारून कल्याण नावाचा मटका चालवत असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्यावर छापा टाकून त्यास मटका घेताना पकडल्यामुळे त्याच्यावर देखील म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
*आरोपींची नावे*
*धनाजी मुरलीधर गुजले*
*सनी नंदकुमार बनसोडे*
*सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी चार्ज कराड श्री अमोल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, देवानंद खाडे, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, विकास बोडरे, विकास ओंबासे यांनी केलेली आहे.
