साहेबराव जाधव यांचे दुःखद निधन
वडूज प्रतिनिधी -विनोद लोहार
वडूज: येथील जुन्या पिढितील टेलर व्यवसायिक साहेबराव पतंगराव जाधव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र, रोहित व संतोष जाधव यांचे वडिल होत.बुधवार दि.२ रोजी सकाळी साडेआठ वाजता सावडण्याचा व दशक्रिया विधी वडूज येथील स्मशानभूमीत होणार आहे.