संविधान विश्लेषक व मानवीहक्क भाष्यकार ॲडव्होकेट असीम सुहास सरोदे यांचे स्पष्टीकरण
*कायद्याची भाषा व न्यायाचा उद्देश संविधानिकता आणणे असल्याने मी त्यासाठी सातत्याने काम करतो आहे. काही राजकीय गटांचे लोक माझ्याबद्दल गैरसमज पसरवीत आहेत त्यामुळे कायदेसाक्षरता आणण्याच्या दृष्टीने स्पष्टीकरण देणे मला आवश्यक वाटते.*
*मी नेहमी कायद्याच्या बाजूने उभे राहण्याचा प्रयत्न करतो. आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन लहान मुलींवर लैगिक अत्याचार झाला त्यामुळे मी स्वतः त्यांना कायदेविषयक मदत दिली, त्या दोन मुलींच्या तर्फे कल्याण कोर्टात वकीलपत्र दाखल केले. त्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कायद्याच्या प्रक्रियेतून शिक्षा मिळावी अशीच मागणी होती. अशी मागणी मी कोणत्याही पक्षातर्फे केली नाही तर न्यायाची मागणीच त्यात आहे.*
या मुलींवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने तो कसा केला, यामागे गुन्हेगारी मानसिकता कशी काम करते, शाळा व्यवस्थापनातील कोणत्या उणीवांचा गुन्हेगार वापर करतात हे सगळे आरोपीविरुद्ध न्यायालयात केस चालली असती व शिक्ष झाली असती तर उघड झाले असते. *महाराष्ट्रातील इतर शाळांमध्ये तश्या उपाय योजना करता आल्या असत्या. त्या आरोपीचे पोलिसांच्या मदतीने एन्काउंटर करण्यात आले, आरोपी मेला त्याचे मला तसूभर सुद्धा वाईट वाटले नाही. पण न्यायाच्या प्रक्रियेची हत्या झाली याचे मला वाईट वाटले.*
* *कल्याण च्या न्यायालयातून निर्णय आला असता तर त्यातून राज्यातील अनेक लहान मुलींना सुरक्षित शालेय शिक्षण हक्क देण्याच्या उपाययोजना करता आल्या असत्या. पण राजकीय लोकांना शिक्षण संस्थेच्या लोकांना वाचवायचे असल्याने व सत्ताधारी पक्षाची प्रतिष्ठा महत्वाची वाटल्याने आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या मदतीने खून करण्यात आला व त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी यासाठीची याचिका केवळ कायद्याचे व संविधानाचे राज्य टिकावे म्हणून केलेली आहे.*
*त्या दोन निष्पाप लहान मुलींनाच नाही तर महाराष्ट्रातील सगळ्या लहान मुलींना सुरक्षीत शिक्षण घेण्याचा हक्क मिळावा हा मला महत्वाचे वाटत होते*
**पण एन्काउंटर चा विचार मान्य करणारे म्हणजे गुन्हेगारीचे समर्थन करणारी बेकायदेशीरता असते हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे त्यामुळे मी कायद्याची प्रक्रिया जिवंत राहावी म्हणून याचिका केलेली आहे. कुणी काहीही अशिक्षित विधाने करोत न्यायाची लढाई सुरु राहील.*
*अन्यायाचे नाव न्याय ठेवणाऱ्या लोकांना सुद्धा न्यायाचे महत्व एक दिवस कळेल.*
*ॲडव्होकेट असीम सुहास सरोदे*
*संविधान विश्लेषक व मानवीहक्क भाष्यकार वकील*