जबरदस्तीची कर्ज वसुली थांबवावी, पळशी महिला संघटनेची मागणी.

जबरदस्तीची कर्ज वसुली थांबवावी!पळशीतील बचतगट  महिलांनी दिले तहसीलदारांना निवेदन

औंध:-खटाव तालुक्यातील पळशी येथील महिलांना लॉकडाऊन काळातील कर्जाच्या परतफेडीसाठी थकीत व रेग्युलर हप्ते भरण्यासाठी होणारी दमदाटी थांबविण्यासाठी सर्व महिलांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तसेच कर्जमाफी करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
                            निवेदनात म्हटले आहे की,क्रेडिट सोसायटी, सहकारी बँका यांनी बचतगटातील महिलांना कर्ज दिले होते,लॉकडाऊनच्या काळात कोणाकडून कर्जाचे हप्ते वसूल करू नये अशा सूचना सरकारने देऊन सुद्धा सदर बँकांचे कर्मचारी वसुलीसाठी तगादा लावत आहेत,महिलांना घरी जाऊन दमदाटी देत आहेत,त्यामुळे घरोघरी जाऊन संबंधित बँका,क्रेडिट सोसायटी यांचे प्रतिनिधींना थांबवावे अन्यथा गळफास लावून घेण्याशिवाय पर्याय नाही,या बंदमुळे एकतर हाताला रोजगार नाही तरी बचतगटातील महिलांनी घेतलेलं कर्ज माफ करावे व कुटुंबे उध्दव होण्यापासून वाचवावीत असेही म्हटले आहे.निवेदनावर २५ महिलांच्या सह्या आहेत.