इंदापूरमध्ये २० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.






इंदापूर : प्रतिनिधी 
          इंदापूर शहरातील अंबिकानगर भागातील गौरव विजय राऊत (वय २०वर्षे, रा.अंबिकानगर, इंदापूर, ता. इंदापूर,जि.पुणे) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२२जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजणेच्या सुमारास घडली. 
        त्याचा नातलग निखील पोपट भोंग (रा. अंबिकानगर, इंदापूर) यासंदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. अज्ञात कारणास्तव रहात्या घरात पत्र्याच्या अँगलला सुती दाव्याच्या सहाय्याने गळफास घेवून वैभवने आत्महत्या केल्याचे खबरीमध्ये म्हटले आहे. 
हवालदार लोंढे अधिक तपास करत आहेत.