इंदापूर येथे नागरी संघर्ष समितीच्या वतीने मास्क वापरण्यासाठी गांधीगिरी.



इंदापूर : प्रतिनिधी


●शहरामध्ये १००० नागरिकांना  मास्कचे वाटप


        इंदापूर नगरीच्या माजी नगराध्यक्षा अलका ताटे व   नागरी संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष प्रा.कृष्णा ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.२२ रोजी इंदापूर शहरामध्ये गांधीगिरीचा वापर करुन १००० नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले.
     
      यावेळी इंदापूर नागरी संघर्ष समितीचे गफूर सय्यद,जयंत नायकुडे,अशोक पोळ,धरमचंद लोढा,सदाशिव व्यवहारे हे सदस्य उपस्थित होते.
         
      यावेळी बोलताना नागरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.कृष्णा ताटे म्हणाले की,इंदापूर शहर व तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी सामुहिकरित्या प्रयत्न केले जात आहेत.नागरी संघर्ष समितीच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे शहरामध्ये जे काही व्यापारी, व्यवसायिक,प्रवाशी आहेत मास्क वापरत नसल्याचे समितीच्या निदर्शनात आल्याने त्या नागरिकांकरिता गांधीगिरीचा वापर करुन त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. ते वापरावे याकरिता जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

     तसेच आपल्याला इंदापूर शहर हे कोरोनामुक्त करायचे असल्याने शासनाने सांगितलेल्या सुचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.शहरातील जो कोणी व्यापारी,व्यवसायिक,नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या दुकानासमोर,घरासमोर नागरी संघर्ष समितीच्या वतीने काळा कागद चिकटवून त्यांचा जाहिरपणे निषेध करणार असल्याचे श्री.ताटे यांनी सांगितले.

        नागरी संघर्ष समितीचे सदस्य गफूर सय्यद म्हणाले की,कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या नागरिकांचे जय इन्सिट्यूट अॉफ नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आरोग्य तपासणीची मोहिम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.नागरिकांनी मास्कचा वापर केला,शासनाच्या नियमांचे पालन केले तर आपण स्वतःला,आपल्या कुटुंबांला या राक्षसरुपी कोरोनापासून दूर ठेऊन आपण त्याला हरवू शकू असे ते म्हणाले.