आटपाडीमध्ये डॉ .शंकरराव खरात यांचं स्मारक उभारावे -साहेबराव चंदनशिवे



आटपाडी : प्रतिनिधी:

स्मारकासाठी मुख्यमंत्री व पालकमंतत्र्याकडे निवदनाव्दारे मागणी.



    आटपाडी तालुक्यात अनेक नावाजलेल्या कवी व लेखक  होऊन गेले यामध्ये गदिमां, शंकरराव खरात व व्यंकटेश माडगूळकर याची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील ,यामध्ये गदिमा आटपाडी तालुक्यात न्याय दिला गेला आहे पण डॉ शंकरराव खरातांचे स्मारक जन्म शताब्दी वर्षात होणार का ? असा प्रश्न माणदेशी रसिक प्रशासनाला विचारत आहे. शंकरराव खरात हे कुलगुरू, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे सदस्य, रेल्वे, बोर्ड चे सदस्य  महाराष्ट्र साहित्य परिषद चे अध्यक्ष, बँक ऑफ इंडिया चे संचालक, महाराष्ट्र राज्य, शिक्षण कमिटी चे अध्यक्ष, यशवंतराव, चव्हाण, सोशल सायन्स अँड रीचर्स इन्स्टिट्यूट मानद सदस्य, अश्या अनेक शासकीय समिती वर काम केलेले आहे.
      या माणदेशी सुपुत्राने आटपाडी तालुक्यातील,दलित साहित्य आपल्या लेखणी ने समृद्ध केले .सध्या  डॉ .शंकरराव खरात यांचे हे जन्म शताब्दी वर्ष असून या वर्षात तरी त्यांचे स्मारक होणार का ? हा एक चिंतनाचा प्रश्नच बनला आहे !
तराळ अंतराळ हे खूपच गाजलेले पुस्तकाने त्याची ओळख सातासमुद्रापार गेली आहे.अगदी
तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत, अधिनियम तयार करण्याचे काम  डॉ,खरात यांच्याकडे सोपविण्यात आले होते, ते त्यांनी यशस्वीपणे पार पाडले ,सन१९५८ ते १९६१ पर्यंत ' प्रबुद्ध भारत' चे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते सक्रिय होते ! पुणे विद्यापीठ ने  डिलीट ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता !
     डॉ. शंकरराव खरात यांना मिळालेले पुरस्कार कोलकाता येथील  भाषा  परिषद तर्फ 'तराळ अंतराळ' या पुस्तकाला माजी राष्ट्रपती झेलसिंग यांच्या हस्ते पुरस्कार ,मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मराठी साहित्यकृती पुरस्कार,कोल्हापूर  छत्रपती श्रीमंत शाहू महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले होते,राष्ट्रपती आर,के, नारायण, यांच्या हस्ते, लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित,महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळा तर्फ,मानपत्र, आणि पारितोषिक,
जागतिक मराठी परिषद तर्फ इस्राएलमध्ये सन्मान ,या शिवाय महाराष्ट्र तील अनेक संस्था, कडून अनेक सन्मान व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .डॉ.शंकरराव खरात यांनी
कादंबऱ्या- १०,ललित - ५,कथा संग्रह-१२,विवेचक ग्रंथ-८ असे विपुल प्रमाणात लेखन केले.
 या शिवाय अनेक लेख व साहित्य प्रसिद्ध तराळ अंतराळ हे आत्म चरित्र इंग्लिशमध्ये अनुवाद होणार आहे  यामुळे आटपाडीतील सक्सेस स्टोरी जगात जाणार आहे.याच खर श्रेय या माणदेशी सुप्रसिद्ध सुपुत्र डॉ शंकरराव खरात यांना जाते.
    डॉ, शंकरराव खरात यांचे दि,९ एप्रिल २००१ मध्ये निधन झाले. त्यास १९ वर्ष झाली ! त्यांच्या स्मारकासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या.मात्र या आटपाडीतील प्रशासनाला कधी दखलही घेतली नाही परिणाम काहीच झाले नाही.पण सध्या तरी यासाठी महाराष्ट्र मधील साहित्य यांच्या पुणे किंवा आटपाडी येथे बैठक घेऊन  पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.म्हणून राज्य सरकारने  किमान जाग होऊन या डॉ शंकरराव खरात यांच्या स्मारकाच्या कामासाठी  निर्णय  घेतला जावा. यासाठीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष,बाळासाहेब आंबेडकर यांना,वंचित बहुजन आघाडीचे आटपाडी तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी निवेदनव्दारे केली.
    तसेच त्यांच्या घराकडे जाण्यासाठी सध्या रस्ता सुद्धा नाही.त्यासाठी आटपाडी ग्रामपंचायतने  किमान दिवाबत्तीची सोय करवी अशी मागणी करण्यात आली आहे.