मा. शरद पवारावर पोस्ट टाकणारा वर कारवाई करा:वडूज पोलिसांना निवेदन.



औंध(वार्ताहर):-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल

बदनामीकारक मजकूर फेसबुकवर टाकणार्या धनंजय कुरतडकर यांच्यावर कारवाई करण्याची  नितीन देशमुख यांची मागणी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या बाबतीत बदनामी कारक मजकूर फेसबुकवर प्रसिद्ध करणाऱ्या धनंजय कुरतडकर याच्या विरोधात वडूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी मुंबई युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
 याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी,मागील काही दिवस धनंजय कुरतडकर हा शरद पवार यांच्याबद्दल बदनामी कारक व त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पोस्ट फेसबुकवर टाकत आहेत. मी नितीन देशमुख हा मूळ रा.सिध्देश्वर कुरोली ता.खटाव येथील रहिवासी असून
  शरद पवार यांच्या बाबतीत कुरतडकर टाकत असलेल्या बदनामी कारक पोस्ट बद्दल  धनंजय कुरतडकर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आपली मागणी आहे असे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे . त्यामुळे तात्काळ संबंधित धनंजय कुरतडकर याच्या वर वडूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा. याबाबत पोलिसांनी त्वरित कारवाई नकेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वडूज पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नितीन देशमुख यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

फोटो.. वडूज पोलिसांना निवेदन देताना नितीन देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी