३२ वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.



इंदापूर : प्रतिनिधी

     इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी परिसरातील शितल अविनाश भोंग (वय ३२ वर्षे, रा. भोंगवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) या महिलेने दि. २२ जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.
              सदर घटनेची खबर मयताचे पती अविनाश एकनाथ भोंग यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात खबर दिली की,  माझी पत्नी हिने काहिही एक कारण नसताना मानसिक तणावाखाली येवून गळफास घेऊन आत्महत्या केली.

       सदर घटनेचा तपास इंदापूर पोलिस ठाण्याचे हवालदार रासकर हे करित आहेत.