माण मध्ये रासपचे दूध वाढीच्या संदर्भात तीव्र आंदोलन



.दि.६ जुलै-
बिदाल प्रतिनिधी-
दूर दरवाढ करण्याची सद्बुद्धी विठुरायाने राज्य सरकारला द्यावी.
दहिवडी तहसीलदार कार्यालयाच्या समोर दुध दर वाढीच्या संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात आले या वेळी पांडुरंगाच्या मुर्तीला दुग्धअभिषेक घालुन पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना  सुदबुध्दी दे की दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या  दुधाचा 35 रुपये भाव मिळावा ही मागणी यावेळी करण्यात आली.
मागील सरकारच्या काळात माजी मंञी पशुसंवर्धन मंत्री मा.महादेवरावजी जानकर असताना दुधाला  27 रू भाव व 5 रू अणुदाण दिले होते आसा एकून 32 रू भाव दिला होता, जर या सरकारने आमची मागणी लक्षात घेऊन दुधाला भाव नाही दिला तर राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
या वेळी  तहसिलदार यांनी  कार्यालयाच्या बाहेर येवू  आंदोलनकर्ते यांचे निवेदन स्विकारले व सरकार पर्यत आपली मागणी पोहचवू आश्वासन देण्यात आले.
यावेळी युवा नेते माण-खटाव विधानसभा अध्यक्ष सचिन होनमाने,ॲड विलास चव्हाण कायदे,सुनिल वाघमोडे , दादा माळवदे साहेब, दत्ता खांडेकर, दादासाहेब विरकर, शिवाजी गलंडे सर, इजि संदीपभाऊ होनमाने , तुषार खाडे,आनंद दोलताडे ,भारत राखुडे, विजय महानवर सर, सचिन वाघमोडे,नितीन काळे सर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी
दहिवडी तहसीलदार कार्यालय येथे आंदोलन करताना रासपचे पदाधिकारी