प्रतिनिधी खेड/प्रसाद गांधी:
सध्या कोरोना च्या वाढत्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात रुग्ण वाढत आहेत त्याचाच एक भाग म्हणून खेड येथील लोटेतील घरडा कंपनीत मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळ ल्याने खेड आणि चिपळूण मधील कर्मचारी यांनी घरडा कंपनीत जाऊ नका असे आवाहन खेड तालुका अध्यक्ष रजनीकांत जधाव यांनी केलं आहे,
तसेच घरडा कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जबरदस्त केली तर त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या स्टाईल ने उत्तरं अधिकारी यांना दिले जाईल तसेच कंपनीचा गेट बंद केला जाईल अशा इशारा देण्यात येत आहे तसेच या खेड तालुका आणि चिपळूण तालुक्यातील कर्मचारी यांनी काळजी करू नये आपल्या सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आपल्या सर्व कामगार वर कर्मचारी यांच्या सोबत आहे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली असेल तर खेड तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांच्या कडे संपर्क साधावा असे जाधव यांनी सांगितले तसेच सर्वांनी घरी रहा काळजी घ्या अशी यांनी विनंती कर्मचाऱ्यांना केली आहे तसेच वेळी आली तर घरडा कंपनीच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडावे लागणार असे खेड तालुका अध्यक्ष रजनीकांत जाधव यांनी सांगितले