पिंपोडे बुद्रुक / : (प्रतिनिधी)
देशामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव असताना आपल्या स्वतःच्या जीवाची कसलीही काळजी न करता निर्भीडपणे जनहिताचे कार्य करणारे तालुक्यातील तहसिलदार, प्रातंधिकारी तसेच डॉक्टर,पोलीस,शासकीय महसूल यांचा केंद्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कोरोना सारख्या महाभयंकर बिकट परिस्थितीमध्ये कोरेगाव तालुक्याच्या तहसिलदार श्रीमती रोहिणी शिंदे व प्रातंधिकारी सौ. किर्ती नलवडे यांनी लॉक डाऊन मध्ये उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून संसर्गजन्य महाभयंकर रोगापासून लोकांना वाचविले. तसेच बाधित संख्या कमीत कमी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळवले. प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व प्रशासकीय यंत्रणा याकामी सज्ज होत्या त्यामध्ये आरोग्य यंत्रणा, महसूल खाते, पोलीस यंत्रणा,यांनी उस्फूर्तपणे आपल्या जीवाची तमा न बाळगता मैदानात उतरून जनतेची सेवा करून उत्तम कामगिरी केली. त्यासाठी तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला केंद्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी केंद्रीय पत्रकार संघाचे पदधिकारी उपस्थित होते.