अवैद्य गांजा शेतीवर एलसीबीचा छापा, 7 लाख 81 हजार 750 रुपये चा गांजा जप्त.


सातारा:-
बनगरवाडी ता. माण येथे एलसीबीने छापा टाकुन गांजा ची झाडे जप्त केली.
गुन्हा अन्वेषण शाखेला खबर मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.
  बनगरवाडी तालुका मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत शिंगाड्याच्या शेत नावाचे शिवारामध्ये एक इसम त्याच्या शेतामध्ये गांजा या अमली पदार्थाचा झाडांची लागवड करून जोपासना करीत असल्या बाबत  तेजस्विनी सातपुते पोलीस अधीक्षक सातारा धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा यांना माहिती मिळाली.
अधिक्षक तेजस्विनी सातपुते पोलीस  यांनी आदेश दिल्यानंतर श्री सर्जेराव पाटील पोलिस निरीक्षक  गुन्हे शाखा सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे पथकासह बनगरवाडी येथे गेले असता, शिंगाडे शेतात दोन जण गांजाची झाले उपडत होते.त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरची गांजाची झाडे विक्री करण्यासाठी लागवड केली असल्याची माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेतले.

बजरंग शिंगाडे  वय 65  भोलेनाथ शिंगाडे  वय 40  गणेश शिंगाडे  वय 35  यांच्या विरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबुराव महामुनी उपविभागीय पोलिस अधिकारी व गणेश वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हसवड पोलीस ठाणे  यांनी या कारवाई त भाग घेतला.