शिंगणापुर च्या गणेश निकम याची गरूड कंमाडो फोर्समध्ये निवड.


माणदेशी कतृत्व.




शिखर शिंगणापुर :  प्रतिनिधी

शिंगणापुर च्या गणेश निकम याची
गरूड कंमाडो फोर्समध्ये निवड झाली आहे. शिंगणापुर गावातील लोकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

मौजे शिखर शिंगणापूर ता.माण या गावचे गणेश निकम याने अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने अथक परिश्रम  , जिद्दी व चिकाटीच्या जोरावर  इंडियन एअर फोर्स मध्ये भरती झाला. एअर फोर्समध्ये कार्य करत असताना यापेक्षा ही माझ्याकडे चांगली सेवा घडावी याकरिता त्याने गरूड कंमाडोचे धडे घेतले.त्याला   इंडियन एअर फोर्समधील मिळालेल्या मार्गदर्शनमुळे त्याला देशाच्या विशेष कार्य बजावणाऱ्या विभागात काम करण्याची संधी मिळाली आहे.नुकत्याच एअर फोर्समधील गरूड कंमाडो विभागात काम करण्यासाठी निवड झाली.
           गणेश निकम याने आपले  जीवनच देशसेवेत घालवायचे या एकाच उद्देशाने त्याने इंडियन एअर फोर्समध्ये भरती झाला .भारत देशाच्या जडणघडणेत आपला काही तरी वाटा असावा.अशी मनोमन इच्छा गणेशची होती.ती इच्छा पूर्ण झाली. परिश्रमाची पराकाष्ठा जिद्द व चिकाटीच्या जोरावर देश सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
    गणेश  निकमच्या गरूड कंमाडो फोर्समध्ये  निवड होण्याबरोबर सातारा जिल्ह्याच्या शौर्यात भर टाकण्याचा बहुमान मिळाला.त्याच्या कार्याला व देश सेवेला समस्त शिंगणापुर ग्रामस्थाच्यावतीने सलाम तसेच गणेश निकमला  पुढील  वाटचालीस शिंगणापुर  ग्रामस्थाकडून    शुभेच्छा देण्यात आल्या .
╔═══════                ══════╗
       देशसेवेचे स्वप्न साकारले  :
 सौ. पुष्पा निकम[ गणेशची आई]
भारत मातेची सेवा करण्याची संधी माझ्या कुटुंबाला मिळाली पाहिजे.हे माझे स्वप्न होते. ते स्वप्न माझ्या मुलाने पूर्ण केले.मला सार्थक अभिमान आहे की देशाची सेवा करण्याचे भाग्य माझ्या मुलाला मिळाले. यापेक्षा मोठी सेवा कोणतीच नाही.