औंध(वार्ताहर):-
पर्यटक वैविध्यपूर्ण फुलांच्या गालीच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठार ,महाबळेश्वर ,पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणांना भेटी देणे पसंत करतात मात्र अशा प्रकारच्या वैविध्यपूर्ण फुलांच्या जाती ग्रामीण भागात फुलविल्यास त्याठिकाणी ही पर्यटक निश्चित आकर्षित होण्यास मदत होईल .औंध हे मुळातच धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे. पण सध्या येथील महाविद्यालयासमोर लावलेल्या
एका वनस्पतींच्या पिकाँक फ्लाँवरच्या
रंगांच्या उधळणीमुळे हा परिसर फुलला असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना एक वेगळाच आनंद यातून मिळत असून जणूकाही हे ठिकाण सध्या सर्वाच्या आकर्षणाचा बिंदू बनले आहे.
एका वनस्पतींच्या पिकाँक फ्लाँवरच्या
रंगांच्या उधळणीमुळे हा परिसर फुलला असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना एक वेगळाच आनंद यातून मिळत असून जणूकाही हे ठिकाण सध्या सर्वाच्या आकर्षणाचा बिंदू बनले आहे.
केसालपिनीय पलचिरिमा म्हणजेच शंखासूर प्रजातीची वनस्पती सुमारे पंधरा फूट वाढते. ही वनस्पती चार ते पाच वर्षात वाढते.या वनस्पतीला जून व जुलै या दोन महिन्यातच कमी पावसाच्या कालावधी मध्ये थंड वातावरणात फुले बहरतात. यामध्ये पिवळी, लाल,नारंगी रंगाची फुले प्राधान्याने येतात.
शंखासूर वनस्पतींच्या या फुलांना पिकाक फ्लाँवर किंवा प्राईड आँफ बार्बाडोस यानावाने ही ओळखले जाते. सध्या या फुलांचा बहर असून औंध येथील राजा श्रीपतराव महाविद्यालय व राजा भगवंतराव ज्यू.काँलेजचा परिसर या मनमोहक फुलांनी फुलून गेला असून याठिकाणचे आल्हाददायक वातावरणात सर्वांना मोहित करून टाकत आहे. कास पठारावरील फुलांच्या गालिचाची आठवण याठिकाणी फुललेल्या पिकाँक फ्लावर्समुळे होत आहे.

येणारे जाणारे नागरिक, पर्यटक ,तरूणाई या फुललेल्या फुलांचे फोटो काढून आपल्या संग्रही ठेवत आहेत तसेच सोशलमिडीया मध्ये ही या फुलांची जोरदार चर्चा सुरू आहे.