कृषी सप्ताह निमित्ताने रायगावात वृक्ष लागवड


मेढा(धनंजय गोरे):-
कृषी दिनाचे महत्व ओळखून साजऱ्यां होत असलेल्या कृषी सप्ताहाचे निमित्त साधून रायगाव मध्ये २०० आंबा झाडांची लागवड करण्यात आली.
या प्रसंगी रायगाव गावच्या सरपंच सौ. राजलक्ष्मी मोहिते. उपसरपंच वसंतराव क्षीरसागर,शिवाजी गायकवाड़,आनंदराव तावरे,जितेंद्र कदम,शरद निकम तसेच गावातील नागरिक या वेळी उपस्थित होते.
      यशवंत  गायकवाड यांनी आपल्या शेता मध्ये दोनशे आंब्याची रोपे लागवड करीत शासनाच्या वतीने साजरा होत असलेल्या कृषि सप्ताह मधे भाग घेत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याचे महत्व या कार्यक्रमप्रसंगी सांगितले,या प्रसंगी नामदेवराव क्षीरसागर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत व आभार मानले.