कोरन्टाईन लोकांच्या भोजनासाठी उद्योजक मेघराज बजाज यांनी केली 51 हजारांची मदत




कर्जत:वार्ताहर-
राशीन येथील प्रसिद्ध उद्योजक मेघराज बजाज यांनी केली 51 हजारांची मदत केली आहे.
 कर्जत तालुक्यातील राशन शहरात पुणे मुंबई यासह अनेक शहरातून आलेल्या लोकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राशीन येथे कोरंन्टाईन करण्यात येत असते.
त्यासाठी बजाज यांनी त्यांच्या जेवणाची व स्वंयपाक यासाठी  त्यांनी 51 हजारांची मदत केली आहे.
मेघराज बजाज हे वासुदेव फर्निचर चे मालक आहेत. त्यांनी आज 51 हजारांचा चेक मंडळ अधिकारी कार्यालय जाऊं तलाठी जितेंद्र गावडे यांच्याकडे सुपूर्त केला
प्रांत अधिकारी मॅडम अर्चना नष्टे व कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत बजाज यांनी ही मदत केली आहे.
 तलाठी जितेंद्र गाढवे यांनी त्यांचे आभार मानले