इंदापूर : प्रतिनिधी (दि.७ जुलै)
इंदापूर तालुक्याच्या ग्राणीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आज (दि.७ जुलै) रोजी इंदापूर शहरातील तांबड्या शाळेजवळ बाब्रस वाड्याजवळील एका 34 वर्षीय पुरूषाची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह अाली आहे. त्यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा इंदापूर शहरात शिरकाव केला आहे.
इंदापूर शहरातील कसबा परिसरातील एका 35 वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी आज (दि.0७ जुलै) रोजी पाॅझिटीव्ह आल्याचे इंदापूर आरोग्य विभागाने सांगितले आहे.
सदर व्यक्ती ही पेशाने शिक्षक असून मागील 3 दिवसांपासून त्यांना शारिरिक त्रास जाणवू लागल्याने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात त्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची कोरोना चाचणी केली असता आज त्याचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या परिसर कंटेंनमेंट झोन म्हणून नगरपरिषदकडून सील करण्यात येणार असून त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा सध्या शोध सुरु आहे.
सध्या इंदापूर तालुक्यात कोरोनाचे एकूण ४१ रुग्ण झाले असून यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १६ रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना घरी देखील सोडले आहे. तर पुणे येथे ४ रुग्णावर तर मुंबई मधील टाटा रुग्णालयात एकावर उपचार सुरु आहे. इंदापूर कोवीड केअर सेंटर मध्ये १५ रुग्णावर तर बारामती मधील रुई ग्रामीण रुग्णालयात ३ रुग्णावर उपचार सुरु आहेत.