मेढा(धनंजय गोरे):-
५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक शंकरराव जांभळे यांच्या वतीने आज मेढा येथे पंचायत समिती कार्यालयात प्राथमिक शाळेतील १००० विद्यार्थ्यांसाठी मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ बाबा शिंदे, माजी उपसभापती दत्ता गावडे, प.स. सदस्य विजय सुतार, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे , अतिरिक्त गटविकास अधिकारी सोनवणे, विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल , शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ दळवी, माजी संचालक सुरेश दुदुसकर, सुनील धनावडे, जयंत गाढवे, विनायक करंजेकर, विलास कारंडे, चंद्रकांत जाधव, इ. शिक्षक उपस्थित होते.तसेच वाढदिवसानिमित्त जांभळे कुटुंबियांच्या वतीने गावातील डोंगरावर 50 झाडे लावण्यात आली. श्री. जांभळे यांच्या या सामाजिक बांधिलकी चे कौतुक करण्यात येत आहे.