लॉकडाऊनच्या काळातील शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची वीज बिले माफ करावीत : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.



 शेतकरी व नागरिकांसाठी पॅकेज जाहिर करण्याची हर्षवर्धन पाटील यांची मागणी 
       
   
इंदापूर : प्रतिनिधी (दि.3 जुलै)..


         
    लॉकडाऊनच्या काळातील शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची वीज बिले माफ करावीत  याकरिता पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवारी (दि.2)  रोजी पुणे येथे रास्ता पेठ,वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

        या  आंदोलनप्रसंगी  बोलताना  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळातील शेतकऱ्यांना व घरगुती ग्राहकांना वीज बिले वाढीव रक्कमेची आलेली आहेत. सदरची वीज बिले अन्यायकारक असून या वीज बिलांना भाजपचा विरोध आहे. राज्य शासनाने  लॉकडाऊनच्या काळातील शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची वीज बिले माफ करावीत, अशी मागणी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
     
         केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही शेतकरी व नागरिकांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे,अशी मागणीही श्री. पाटील यांनी यावेळी केली. यावेळी सदरच्या मागण्यांचे निवेदन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले.

       याप्रसंगी माजी मंत्री संजय भेगडे, आ.भीमराव तापकीर, आ.राहुल कुल, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व  जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.