शंभू महादेव फाऊंडेशन व महादेव शिंदे[धारावी ] यांच्यावतीने शिंगणापूर आरोग्य पथकाचा सन्मान



शिखर शिंगणापूर :
    गावातील सर्व परिस्थिती व येणाऱ्या अडचणीला बगल देत आपल्याकडे शासनाने दिलेली जबाबदारी उत्कृष्ट निभवणाऱ्या आरोग्य अधिकारी    आशासेविका आरोग्य सेवक पोलिस पाटील अंगणवाडी सेविका मदतनीससह आरोग्य शिपाई या सर्वाच्या धाडस व कर्तव्यदक्ष कार्याचा सन्मान म्हणून
सर्वांना साडी , कोरोनाविषयक नोंद ठेवणारे साहित्य व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप श्री शंभू महादेव फाऊंडेशन व महादेव शिंदे [ धारावी ] यांच्यावतीने
करण्यात आले. 

कोरोनाच्या महामारीत आपले कर्तव्ये व जबाबदारी अतिशय उत्कृष्ट पध्दतीने संभाळत त्यानी शिखर शिंगणापूर कोरोनामुक्त ठेवण्याचे काम केले आहे. शिंगणापूर हे तीर्थक्षेञाचे ठिकाण तसेच  सोलापूर, सांगली ,   पुणे व सातारा या जिल्ह्याच्या बहुतांशी वाहतुक शिंगणापूर मार्गे चालत असल्याने शिंगणापूर आरोग्य पथकावर फार मोठी जबाबदारी होती.ती जबाबदारी वाटते तेवढी सोपी नसताना सुध्दा आपण कोरोनाच्या महामारीत योध्दा म्हणून काम करून गाव कोरोनामुक्त ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे.गेली तीन महिन्यापासून अहोराञ काम करत आहेत.
          तसेच गावचे पोलिसपाटील,  आरोग्य सेवक,आशा सेवीका, अंगणवाडी सेविका व मदतनीस  यांनी  कोरोना काळामध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता शिंगणापूर मधील नागरिकांची आरोग्याची काळजी घेत आहेत.
          कोरोनाची लढाई ही जिवावर उधार होऊन करणारी मोठी यंञणा आरोग्याच्याबाबतीत पहावयास मिळाली. एखाद्या कुंटुंबातील व्यक्तीला जर कोरोना असेल तर कुंटुंबातील इतर व्यक्ती पुर्णताः दुर्लक्ष  करतात माञ आरोग्यविभागाकडून कोरोना पासून बचाव होण्यासाठी अहोराञ झटत आहेत. या जगात कुणी कोणाचे नसते यांची प्रचिती कोरोनाच्या महामारीत दिसून आली.
   
                 
    डाँक्टर्स डे व महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त खऱ्या कोरोना योध्दाच्या कार्याचा सन्मान होणे गरजेचे आहे.

यामध्ये सुमारे २० जणाची  टिम गावाला कोरोनामुक्त व भयमुक्त ठेवण्यासाठी त्यानी मोठे परिश्रम घेतले आहे.त्यानी केलेल्या कामाचे ऋण कधीच उतरू शकणारे नाही.अशा लोकाना आरोग्यासंदर्भात अधिकाधिक काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठी डाँक्टर डे व महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त खास भेट देण्यात आले.




आरोग्य विभागात आपले कर्तव्ये बजावणाऱ्या टिमचा सन्मान  करताना विरभद्र कावडे , बाळासाहेब भोसले , संतोष बोराटे , प्रकाश कुंभार , किसन होळ , सोमा ठाकरे , संजय पवार,पांडुरंग खंदारे ,विकास झांबरेसह इतर उपस्थिताचा फोटो.