राज्यातील कृषी महाविद्यालयात आंधळा कारभार , महाराष्ट्रशासन अनभिज्ञ .


सातारा:प्रतिनिधी-


राज्यातील कृषी महाविद्यालयात आंधळा कारभार सुरू असुन शासन यापासून अनभिज्ञ आहे.
शासनाच्या व कृषी महाविद्यालयाच्या आडमुठ्या धोरणामुळे कृषी पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले असुन नवीन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम वर्गात प्रवेश न घेण्याचा विद्यार्थ्यांनी सामुदायिक निर्णय घेतला आहे.प्रवेश पोर्टल बंद असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

कृषी महाविद्यालय,  कोल्हापूर येथे शिकत असलेल्या कृषी पदव्युत्तर विद्यार्थी नितीन हनुमंत मोरे मु.पो लोणंद जि. सातारा याने सांगितलेली ह्रदयद्रावक कहाणी.


1)   दि. 25 फेब्रुवारी 2020    ते
5 मार्च 2020 महाराष्ट्रातील
आम्ही सर्व कृषी विद्यापीठातील कृषी पद्युत्तर विद्यार्थी,  महाराष्ट्र शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे
कृषी पद्युत्तर पदवीला व्यासायिक दर्जा मिळावा म्हणून ठिय्या आंदोलन करत होतो.
शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी विद्यार्थ्यांना  Mahadbt portal वर  Scholarship Freeship EBC चे form भरण्याची अंतिम दि. 29 फेब 2020 रोजी समाप्त झाली. कृषी पद्युत्तर पदवीला व्यावसायिक दर्जा म्हणून

फक्त 5 दिवस उशिराने कृषी पद्युत्तर पदवीला व्यावसायिक घोषित करण्यात आले. त्यावेळी आम्हाला सांगण्यात आल कि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना Form भरता यावे म्हणून काही दिवसात पुन्हा MAHADBT PORTAL
चालू करण्यात येईल.
आज 5 महिने झाले तरीही अजून MAHADBT PORTAL अजूनही चालू केले नाही.
एकीकडे व्यवसायिक दर्जा दिला गेला पण त्या व्यासायिक दर्जाचा लाभ घेण्यापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं जातंय.

*महाराष्ट्रातील चारही कृषीविद्यापीठातील कृषी पद्युत्तर विद्यार्थ्यांचे*
 *दुसऱ्या सत्रहचे Registration*
 *दि. 12 मार्च ते 18 मार्च ठेवण्यात आले* **होते.* *आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी
दुसऱ्या सत्रची सर्व Fees भरून  Registration केले.* *दि. 19 मार्चला कॉलेजला नोटीस लावण्यात आले होते ज्यामध्ये असे नमूद केले होते कि सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृह compulsory रिकामे करायचे आहे. कृषीमहाविद्यालय पुढील आदेश येई परेंत बंद ठेवण्यात येणार आहे.

दुसऱ्या सत्रच्या सुरुवातीपासून सगळे विद्यार्थी त्यांचा घरी आहेत.
वसतिगृहात सगळ्या विद्यार्थ्यांचे साहित्य एकाच खोलीत एकत्र ठेवण्यात आले असून बाकी सर्व खोल्यांचे  रूपांतर  Covid-19 Care Centre मधे करण्यात आले आहे.
दुसऱ्या सत्र मधे एकही विद्यार्थी वसतिगृहात राहिलेला नाही. तरीपण
1) Hostel fee
2) Electricity Bill
3) Library fee
4) Tuition fee
5) Gymkhana fee
दुसऱ्या सत्र ची वरील गोष्टींची fee सर्व विद्यार्थ्यांनी भरलेली आहे.

3) तसेच सर्व महाराष्ट्रात सगळ्या कृषी पद्युत्तर विद्यार्थ्यांना शिक्षण सारखच मग
विद्यार्थ्यांनकडून  प्रत्येक विद्यापीठात वेगवेगळी Fee का घेतली जात आहे.
शिक्षण सारखेच मग Fee का एकसारखी नसावी.

**मार्च महिन्यापासून Lockdown चालू आहे. किती दिवस लोक घरी बसून आहेत. कधीकधी अधूनमधून सर्व काही 9 ते 2 या कालावधीत सुरु करण्यास परवानगी दिली जाते. 9 ते 2 या कालावधीत कोणत्याही व्यवसायातील कामे किती करता येतात याचा आपण विचार करावा.*
 *कुणाचे आईवडील शेतकरी आहेत, कुणाचे शेतमजुर आहेत, कुणाचे छोटे दुकानदार, छोटे व्यवसायवाले आहेत.*
  Lockdown ने  आधीच लोकांचं कंबरड मोडल आहे , लोक कर्जबाजारी होयला लागली आहेत.  सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती ढसाळली आहे.
अश्यातच तिसऱ्या सत्रच्या Registration साठी एवढीभली मोठी रक्कम विद्यार्थ्यांनी कुठून भरायची , सर्व काही समोर बघून घरच्यांकडे पैसे नाहीत हे माहित असून घरच्यांना कोणत्या तोंडाने fee भरण्यासाठी पैसे मागायचे हा विद्यार्थ्यांपुढे गंभीर प्रश्न उभा झाला आहे.
सर्व कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी खालील निवेदने हे आपापल्या  विद्यापीठाच्या सहयोगी अधिष्ठाता,
अधिष्ठाता, कुलगुरू तसेच
दादाजी भुसे साहेब
विश्वजित कदम साहेब  महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद,  पुणे.
यांना email द्वारे कळविले आहे.

काही विद्यार्थ्यांनी
राजू शेट्टी साहेब
संजय जाधव साहेब
रोहितदादा पवार यांना समक्ष जाऊन निवेदन दिले आहे. मात्र अद्यापही याबाबत शासनाने निर्णय घेतला नाही..