इंदापूर येथे सृजनशील उपक्रमाअंतर्गत अॉक्सिजन पार्क निर्मिती.



इंदापूर : प्रतिनिधी



 ●इंदापूर महाविद्यालयात ऑक्सीजन पार्कची निर्मिती होणार.
 
  ●अनेक प्रकारच्या झाडांचे,फुलांचे संगोपन होणार.

  ●अनेक प्रकारचे पक्षी, विविध जातींची फुलपाखरे यांच्या वास्तव्यांमुळे महाविद्यालयाच्या सौंदर्यात भर पडणार.

 
        इंदापूर येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (आय कॉलेज) परिसरामध्ये सृजनशील उपक्रमांतर्गत संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्‍यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सृजनशील उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात.या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाचा परिसर हा निसर्ग संवर्धनाचा महत्त्वाचा घटक व्हावा या हेतूने एकूण सात बागांमध्ये जैव विविधता जोपासत या ऑक्सिजन पार्क ची निर्मिती करण्यात आली आहे.
    या सृजनशील उपक्रमाअंतर्गत अॉक्सिजन पार्क मध्ये छोटी छोटी एकूण सात बागांमध्ये वने विकसित करण्यात आली असून यामध्ये वड,पिंपळ,उंबर,अर्जुन सादडा,सिसम,पुत्रंजीवी,हत्तीलिंग,बेल,बेहडा,हिरडा,कैलासपती,कडुनिंब,जाई,जुई,मोगरा,सायली,कृष्णकमळ,पारिजातक,रुई,गोकर्ण,सोनचाफा, हिरवा चाफा,पिवळा चाफा,गुलमोहर,निलमोहर,शंखासुर, चिंच,विलायती चिंच,काटेसावर,कण्हेर,चंपा,बॉटलपाम, नारळ,ऑरोकॅरिया यासारख्या वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.
 या अॉक्सिजन पार्क निर्मिती करता श्री.नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या 'शहा नर्सरी' मधून वरील रोपे मोफत उपलब्ध झाली.
      या ऑक्सिजन पार्कमध्ये चिमणी,मैना,दयाळ,साळुंखी, मुनिया,टीपकेवालीमुनिया,टिटवी,पानकावळा,कोरमोरंड, ब्राह्मणी घार,ताम्हण,घुबड,ब्राह्मणी मैना,भारद्वाज, वटवाघुळ,पारवा,कबुतर,वेडाराघू,पोपट,बाया,सुगरण,सुतार, लालबुड्या,कोतवाल यांसारखे अनेक पक्षी वास्तव्य करत आहेत.
     तसेच विविध जातींची फुलपाखरे व पतंग आहेत.एकूण सात बागांमध्ये जैव विविधता जोपासत ऑक्सिजन पार्क ची निर्मिती झाली आहे.
    या पार्क निर्मितीमध्ये विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले आहे.
    या अॉक्सिजन पार्कमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारची फुले,पक्षी आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे हा परिसर महाविद्यालयाच्या सौंदर्यामध्ये भर घालत आहे.