राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष व त्यांची पत्नी यांना कोरोनाची बाधा



इंदापूर : प्रतिनिधी

       राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष व त्यांच्या पत्नी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती व्यवस्थित असून पुण्यामध्येच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात ते राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणे,पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांच्या सोबत तालुक्यात दौरा करत नागरिकांना मदत करत होते.त्यांनी गावोगावी जाऊन बरोजगार,हाताला काम नसलेले गरीब यांना मदतीसाठी आवाहन करुन व त्याकामामध्ये पुढाकार घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संपर्क ठेवला होता.

          दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आला होता. त्यानंतर स्वतःहून त्यांनी पुण्यात तपासणी केली.त्यावेळी त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले.त्यानंतर त्यांच्या पत्नीची तपासणी केली असता.त्यांचाही अहवाल पॉझिटीव्ह आला.सध्या ह्या दोघांवर पुण्यातील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.