शिखर शिंगणापुर : कोरोनाच्या महामारीत कोरोनाची संख्या वाढू नये याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या सिमा बंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. सुमारे चार महिन्यापासून सातारा ते सोलापूर [शिंगणापुर मार्गे] मार्ग बंद होता. सातारा जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्याचे आरोग्य , मार्केट , शेतीविषयक साहित्य, व्यवसायिक साहित्य मिळण्याची मोठी बाजारपेठ असलेल्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते व अकलूज या ठिकाणी जात होते.
अनेक वर्षापासून सोलापूर व सातारा जिल्ह्याचे व्यापारीकरणसह आरोग्यसेवा त्वरीत मिळण्यासाठी फार मोठी मदत मिळत होती व मिळत आहे.माञ लाँकडाऊनचे सञ चालू झाल्यापासून आरोग्यसेवेसह सर्व सुखसुविधा मिळणे बंद झाले .जिल्हा सीमा बंदीची काही लोकाना मोठी किंमत मोजावी लागली. शिंगणापुर , मोही , खुटबाव , वावरहिरे , थदाळे , मार्डीसह इतर परिसरातील गावातील गेली चार महिन्यापासून रूग्णाचे हाल झाले होते.तर काही रूग्णाना वेळेत उपचार मिळाला नसल्याने जीव गमवावा लागला.
केवळ वेळेत उपचार मिळू शकला नसल्याने मानसिक शारिरीक व आर्थिकचे मोठे नुकसान झाले. कोणतीही आरोग्यासंदर्भात सुखसुविधा मिळत नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागला.त्यामध्ये रूग्णाचे अतोनात हाल झाले.
अत्यावश्यक सेवेसाठी काही तरी तोडगा काढण्यात यावा .याबाबत अनेकदा प्रसारमाध्यमाकडून आवाज उठवला गेला. जिल्हा सीमा बंदी असावी .माञ अत्यावश्यक सेवेसाठी विशेष उपाययोजना मिळावी.हा महत्त्वाचा मुद्दा होता.
याला राज्याचे तडफदार कर्तव्यदक्ष गृहराज्यमंञी ना.शंभूराज देसाई साहेबाच्या माण तालुका कोरोनाबाबतच्या आढावा दौऱ्यावर आल्यानंतर दहिवडी येथे पञकार परिषदेत काही पञकारानी आरोग्यसेवा तातडीने मिळण्यासाठी दहिवडी शिंगणापुरमार्गे सोलापूरला जाणारा रस्ता खुला करून गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली.
मंञीमहोद्यानी क्षणाचा विचार न करता सोलापूर प्रशासनाशी संपर्क केला.तसेच सोलापूरचे पालकमंञी ना.दत्ताञय भरणे साहेबाशी बोलतो लवकरच नातेपुते घाट सुरू करून अत्यावश्यक सेवेमध्ये होणारी गैरसोय दूर केली जाईल.या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली. अत्यावश्यक सेवेसाठी नातेपुते घाट सुरू केल्याबद्दल मा.ना . शंभूराज देसाई साहेबाचे पंचक्रोशीतील ग्रामस्थानी आभार व्यक्त केले.
नातेपुते घाटातील रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवण्यात आले. रस्ता खुला करताना नातेपुते पोलिस स्टेशनचे अधिकारी उपस्थित राहून गृहराज्यमंञ्याच्या आदेशाचे पालन करीत आम्ही अत्यावश्यक सेवेसाठी शिंगणापुर -नातेपुते घाट सुरू करीत आहोत.अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केली .

