इंदापूर : प्रतिनिधी (दि.९ जुलै, २०)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इंदापूर शहर व तालुका संघाच्या वतीने सरडेवाडी ( ता. इंदापूर ) येथील अथर्व मंगल कार्यालयात गरीब, गरजू व शेतमजूर कुटुंबियांना मोफत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच कृषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रदिप गारटकर म्हणाले की, पत्रकार हे आपली लेखणी चालवून उपेक्षितांना न्याय मिळवून देतात. मात्र त्याबरोबरच पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून कोरोना संचारबंदी तसेच अनलॉक मध्ये होरपळलेल्या गरजूंना जीवनावश्यक किट वाटप केले. पत्रकार संघाचा हा उपक्रम स्तुत्य आहे.
यावेळी मधुकर भरणे म्हणाले, कोरोना संचारबंदीत इंदापूर तालुक्यात सर्वाधिक रक्तसंकलन व जीवनावश्यक किट चे वाटप झाले. त्यामध्ये या पत्रकार संघाचे मोठे योगदान आहे.
तसेच पत्रकार संघाचे इंदापूर तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी सांगितले की, संघाच्या माध्यमातून 8 हजार लोकांना जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले असून 5 हजार कलाकारांना किट वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
यावेळी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे, उपाध्यक्ष संदीप सुतार, पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे, पुणेजिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, जिल्हाकार्यकारणी सदस्य सुरेश मिसाळ, भीमराव आरडे,सचिन खुरंगे, उदय जाधव - देशमुख, शिवाजी पवार, जावेद शेख, इम्तियाजमुलाणी,विजय शिंदे, प्रेस फोटोग्राफर स्वप्नील चव्हाण, राजू भोसले, शिवकुमार गुणवरे, युवक नेते राजाराम सागर, ग्रामपंचायत सदस्य सतीश चित्राव, पांडुरंग जाधव, रामदास पिंपरे, अतुल ढावरे, मोहन सरडे, हनुमंत चित्राव, सचिन शिरसाट, गोरख जाधव, एकनाथ सागर, प्रशांत सरडे, ग्रामसेवक शहाजी कोकाटे उपस्थित होते..