सामाजिक अंतर ठेऊन कोरोनाच्या संकटात देखील जावली बँकेची गुरुपौर्णिमेची परंपरा कायम


मेढा(धनंजय गोरे)
:-जावली सातारा सह मुंबई करांची अर्थवाहिनी असलेल्या डी एम के जावली सहकारी बँकेचे संस्थापक वै.हभप दत्तात्रय महाराज कळंबे यांना सर्वच जण गुरुस्थानी मानून आज पर्यंत  संचालक मंडळाने सलग सतरा वर्षे गुरुपौर्णिमेची परंपरा अखंड सुरु ठेवली असून या वर्षी कोरोनाच्या संकटकाळात सुद्धा मुंबईतील माधवबागेत सामाजिक अंतर व शासकीय निर्बंध पाळून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला

   दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी वृंद आणि कर्मयोगी दत्तात्रय महाराज कळंबे विश्वस्त मंडळ प्रतिष्ठान सदस्य यांचे संयुक्त विद्यमाने सी पी टॅंक, माधवबाग येथे सात दिवसाचा कार्यक्रम अखंडित सुरू ठेवीत गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी बँकेचे सभासद,  खातेदार, ठेवीदार व बँकेचे आजी माजी संचालक व कर्मचारी वर्ग यांनी बहू संख्येने उपस्थित  राहून कार्यक्रमात सहभाग घेतला होता.     
        दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील गुरुपौर्णिमा निमित्त  सी. पी. टॅंक, येथील संत ज्ञानेश्वर हॉल येथे सकाळी सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य ह.भ.प.वै. दत्तात्रय महाराज कळंबे यांचे व माऊली विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन करून एक दिवसाचा कार्यक्रम झाला.
कोविड-19  कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर  सदरचा कार्यक्रम यावर्षी छोटेखानी कमीत कमी उपस्थितीत करण्याचे विश्वस्त मंडळाने ठरविले होते.  त्याप्रमाणे महाराजांना गुरुस्थानी मानणारे भक्तगण  तसेच बँकेचे सन्माननीय पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कर्मचारी वृंद  यांना महाराजांचे प्रतिमेचे दर्शन घेण्याकरिता उपस्थित होते
      कोरोना महामारी संकटाचे पार्श्वभूमीवर ठरल्याप्रमाणे सात दिवसाचा गुरुपौर्णिमा उत्सवा ऐवजी एक दिवसाचा  कमीत कमी उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे, उपाध्यक्ष प्रकाश मस्कर, संचालक व मंडळाचे पदाधिकारी राजाराम ओंबळे,  राजेंद्र कळंबे, बँकेचे माजी संचालक चंद्रकांत दळवी, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  दत्ता कळंबे, वरिष्ठ व्यवस्थापक अनिल सणस,  कर्मचारी युनियन प्रतिनिधी एकनाथ ओंबळे, महादेव वाडकर, युनियन  कमिटी सदस्य कर्मचारी खातेदार व ठेवीदार उपस्थित होते