इंदापुर : प्रतिनिधी (दि.१जुलै)
इंदापूर शहरातील विचारमंथन ग्रुपच्यावतीने बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील बाबा चौक ते एस टी स्टॅण्ड गेटच्या व पंचायत समिती चौक ते शिवाजी पुतळा, खडकपुरा चौकापर्यत रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारे फळ वाटप विक्रेते,हारवाले,हातगाडी धारक व किरकोळ सर्व व्यवसाय करणारे स्टाॅल धारक व्यापारी यांना सॅनिटायझर ५०० मिलीच्या २५० बाॅटलचे वाटप
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती, सदस्य पुणे जिल्हा परिषद प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यकमास विचारमंथन ग्रुपचे सदस्य इंदापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, नगरसेवक अमर गाडे, शोएब बागवान , बाळासाहेब सरवदे , गणेश महाजन, शिवाजीराव मखरे , विशाल चव्हाण,नानासाहेब नरूटे, संदिपान कडवळे, नितीनराव आरडे,वसंतराव आरडे,सागर शेंदूरकर,माऊली नाचण, हामिद आत्तार,हणुमंत कांबळे, भगवान महाडीक उपस्थित होते.