इंदापूर : प्रतिनिधी (दि.१जुलै)
निरोगी बालपण" या उपक्रमाअंतर्गत जन्मलेल्या बाळापासून ते 18 वर्ष खालील सर्व रुग्णांची मोफत तपासणी.
कोरोना या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. याचा प्रभाव देशात, राज्यात आणि इंदापुर तालुक्यातही जाणवत आहे. लॉकडाऊन कालावधीत तालुक्यातील जनतेला आर्थिक झळ सोसावी लागली आहे. यामुळेे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून गोरे हॉस्पिटल व रोटरी क्लब इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने "निरोगी बालपण" हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ आज (दि. १जून) रोजी डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे उदघाटन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप दादा गारटकर व रोटरी क्लब अॉफ इंदापूर अध्यक्ष अजिंक्य इजगुडे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
निरोगी बालपण या उपक्रमाअंतर्गत जन्मलेल्या बाळापासून ते 18 वर्ष खालील सर्व रुग्णांची दररोज पुढील एक महिन्यापर्यंत सकाळी 11 ते 3 या वेळेत मोफत तपासणी केली जाणार असल्याचे गोरे हॉस्पिटल चे डॉ. पंकज गोरे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी डॉ.पंकज गोरे व रोटरी क्लब अॉफ इंदापूर यांनी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करून कोरोनाच्या संकटाच्या काळात अडचणीत असलेल्या गोरगरीब जनतेला निरोगी बालपण उपक्रमाचा फायदाच होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी रोटरी क्लब अॉफ इंदापूर च्या वतीने डॉ. पंकज गोरे व त्यांचे वडील प्रा. पांडुरंग गोरे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी वसंतराव माळूजकर, ज्ञानदेव डोंबाळे, राकेश गानबोटे,शशिकांत शेंडे,उदय शहा,नगरसेवक अनिकेत वाघ, सुनील मोहिते, प्रशांत भिसे, अॅड.आसिफ बागवान,दशरथ भोंग, प्रशांत शेटे,भीमाशंकर जाधव,शंकर करे, हे सर्व रोटरी सदस्य यावेळी उपस्थित होते.
