शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करणार- रुपेश गायकवाड





आटपाडी प्रतिनिधी.

कृषिकन्या बहुउद्देशीय संस्थेचा बहुमोलाचा मदतीचा हात..

गरिबांना केलं मोफत किटच वाटप ..

    सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणू मुळे हाहाकार माजला आहे.आज अनेक गरिब जनतेच्या हाताला काम नाही, सरकार मदत देण्यासाठी कमी पडत आहे अशावेळी ज्यांची मदत करण्याची दांत आहे अशा उद्योजक, ट्रस्ट, कंपनी, सेवाभावी संस्था यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मदतीच्या आवाहनस प्रतिसाद देत मदत करत आहे.
    आटपाडी तालुक्यातील शेटफळेतील कृषिकन्या बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक व अखिल भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष रुपेश गायकवाड यांनी गावातील गरजू गोरगरिबांना 400 जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे मोफत वाटप करण्यात आले.शेटफळे गावचे एक प्रयोगशील शेतकरी रुपेश गायकवाड व अमर गायकवाड यांची नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावून जातात.सध्या या लॉकडाउनच्या अनेक गोरगरिबांच्या हाताला काम नसल्यामुळे डाँ मिळत नाही त्यामुळे अनेक कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. कुटुंबातील सदस्य याना कस जगवायचं हा प्रश्न आ वासून समोर आहे आशा विवंचनेत असताना या गायकवाड बंधूनी  मदतीची पुढे येऊन गरजूंना मोलाची मदत केली. यामुळे अनेक गोरगरीब व गरजू लोकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे यामुळे गायकवाड बंधूंचे सर्वांनी मनापासून त्यांचे आभार मानले.

बळीराजाला देणार मोफत बियाणे...रुपेश गायकवाड
     सध्या कोरोना मुळे अनेक शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत असताना त्यास मदतीची निकड आहे.सध्या त्यातच जिल्हा बंदी असल्याने बियाणांच्या  वेळेत पुरवठा न झाल्यास तुटवडा होऊ नये याची काळजी घेऊन या  पेरणीचा हंगाम सुरू असताना  बियाणं  शेतकऱ्यांना  देण्याचा निर्णय घेतला आहे.