उच्चशिक्षित इंजिनिअर लोंढे करपे यांचा सत्यशोधक पद्धतीने देवदैठण येथे विवाह संपन्न




अहमदनगर (श्रीगोदा).

समता परिषदच्या कार्यकर्त्यांनी व त्यांचे मुला मुलींनी सत्यशोधक  पद्धतीने विवाह करून गरजूंना मदत करावी-मंत्री छगन भुजबळ.


- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन पुणेच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, नगर जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष लोंढे यांचा मुलगा उच्चशिक्षित सत्यशोधक चंदन लोंढे ,सिव्हिल इंजिनिअर आणि लायन्स क्लब चाकण चे अध्यक्ष अविनाश उर्फ बाबासाहेब करपे यांची मुलगी सत्यशोधिका रिया करपे ,इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर यांचा कोणताही गाजावाजा न करता महात्मा जोतीराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म  ग्रंथात सांगितलेले पद्धतीने समर्थ लॉन्स , देवदैठण, श्रीगोदा येथे  दि.30 जुन 2020 रोजी सायं.6 वाजता  कोव्हिडं 19 चे नियमाप्रमाणे सत्यशोधक  विवाह संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे आ . निलेश लंके , मा .आ .राहुल जगताप  , जि .प .उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार , बाजार समिती चेअरमन प्रशांत शिंदे , मा . जि .प . उपाध्यक्ष सुजित झावरे पा . ,श्रीगोंदा सह . साखर कारखाना व्हा. चेअरमन ज्ञानदेव हिरवे ,समता परिषद प्रदेश कार्यकारिणी सदस्य  अंबादास गारुडकर  , शरद झोडगे
हे मान्यवर उपस्थित होते.
*याप्रसंगी अन्न पुरवठा नागरी व संरक्षण मंत्री व नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ साहेब विवाह प्रसंगी गर्दी होऊ नये म्हणून शुभ संदेश पत्र व प्रत्यक्ष फोन करून म्हणाले की महात्मा फुले,सावित्रीबाई फुले , छत्रपती शाहू महाराज , डॉ.आंबेडकर यांनी स्त्री पुरुष समानता, मानवता धर्म  या बाबत खूप मोठे कार्य केले असुन त्यांचे सामाजिक कार्याचा आदर्श लोंढे व करपे यांनी घेतला आहे. या पुढे समता परिषदच्या सर्व कार्यकर्त्यांनी व त्यांचे मुला मुलींनी , नातेवाईकांनी अंधश्रद्धा कर्मकांड , महूर्त, पंचाग, वेळ याला फाटा देत सत्यशोधक पद्धतीनेच विवाह तर केला पाहिजेत , सोबत याचा प्रसार गावोगावी करावा. पुढे भुजबळ साहेब असेही म्हंणाले की विवाहविधी प्रसंगी महाराष्ट्र शासन नियमांचे पालन करीत आर्थिक उधळपट्टी करू नये , तरच सर्व सामान्य जनता कर्जबाजारी होणार नाही असा मौलिक सल्ला देत गरीब गरजु बांधवाना मदत करावे असे आवाहन केले*.
आजचा सत्यशोधक पद्धतीने  विवाह अध्यक्ष रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत लावून वधु वर यांचे विवाहाची रजिस्टर नोंदणी करून त्यांना यावेळी जेष्ठ उद्योजक दत्तात्रय गायकवाड यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व  महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली.तर महात्मा फुले रचित मंगळाष्टकाचे गायन व भारतीय संविधान उद्देशिका वाचन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा.सुदाम धाडगे व सत्याचा अखंड गायन रघुनाथ ढोक यांनी केले.
विवाहाचे सुरुवातीला वधु वर यांचे शुभहस्ते थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्ध पुतळ्यास हार व भारतीय संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय राष्ट्रीय ग्रंथ व इतर पुस्तकाचे फुले अर्पण करून पुजा केली.
 या लॉक डाऊन मधील विवाहाने नातीगोती आणखी जवळ येऊन नाते दृढ होऊ लागली आहेत आणि नाहक आर्थिक उधळपट्टी देखील कमी होऊ लागली हा आदर्श  परिवाराने दिल्याने आता  परिसरातील सर्वसामान्य  कुटुंबातील वधु वर या पद्धतीनेच विवाह करतील अशी आशा  निर्माण झालेचे
सर्वत्र चर्चा रंगली होती.
विवाह प्रसंगी अक्षता म्हणून तांदूळ न वापरता फुले वापरले .शेवटी आभार  समता परिषद जिल्हाअध्यक्ष सुभाष लोंढे यांनी मानले तर मोलाचे सहकार्य आकाश ढोक यांनी केले.