दिवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अर्सेनिक गोळ्यांचे वाटप.










▬▬▬▬▬▬▬▬
ग्रामीण महाराष्ट्र न्यूज
▬▬▬▬▬▬▬▬

देवापुर -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यातील दिवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्री. अशोक सावंत यांच्या  वतीने अ‍ॅरसॅनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी
यावेळी 500 कुटुंबांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले .

 ग्रामस्थांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती चांगली असणे आवश्यक आहे. लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी श्री. अशोक शेठ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली  या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे.

यावेळी उपसरपंच दादासाहेब सावंत,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिंदे, निलेश सावंत, जाकिर सय्यद, दत्तात्रय कांबळे, रामभाऊ पुढारी, सतीश घुटुकडे, किरण सावंत ,शिवाजी तुपे व ग्रामस्थ उपस्थित होते.