मेढा केळघर रस्ता होणार अपघात ग्रस्त, ठेकेदारांची दिरंगाई मुळे अपघाताला निमंत्रण.



        ═══════════
🌍   ग्रामीण महाराष्ट्र न्यूज

        ═══════════
मेढा(धनंजय गोरे):- केळघर-मेढा रस्ता वाहतुकीस असुरक्षित होत असून रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने अपघातांचे प्रमाणात वाढ होत आहे.
सध्या विटा-महाबळेश्वर या रस्त्याच्या चारपदरी करणाचे काम काही ठिकाणीच गतीने सुरू आहे. मात्र हे काम सलगपणे न करता थोडे थोडे केले जात आहे.,. 
       केळघर ते मेढा दरम्यान केळघर गावच्या प्रवेशद्वारावर रस्ता एक बाजूने उकरलेला आहे. दुसरी बाजू डांबरीकरण केली आहे.मात्र एक बाजूला पूर्णपणे रस्ता तसाच ठेवला आहे. त्यातच दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याने या रस्त्यावर दुचाकी चालवणे जिकिरीचे झाले आहे. या दोन दिवसात केळघर गावच्या प्रवेशद्वार जवळ चार ते पाच दुचाकी स्वार घसरून पडले आहेत. रस्ता निसरडा व चिखलमय झाल्याने गाड्या घसरू लागल्या आहेत.
वास्तविक ठेकेदाराने पावसा आधी रस्त्याचे काम निदान एका बाजूने तरी पूर्ण करणे आवश्यक होते. गेल्या अडीच महिने लॉक डाउन सुरू असल्याने केळघर हद्दीतील रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र ठेकेदार कूर्म गतीने काम करत असल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे.इतर ठिकाणी गतीने काम सुरू असताना देखील केळघर ते आंबेघर हद्दीपर्यंत काम अपुरे असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. एखादा गंभीर अपघात झाल्यावर ठेकेदाराचे डोळे उघडतील का असा सवाल वाहनचालकाकडून  उपस्थित होतो आहे.