___________ ग्रामीण महाराष्ट्र ___________ सांगली, आटपाडी दार वर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे समस्या व संवर्धन विषयी जागरूकता निर्माण करणे आणि आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून अजित कुमार(जिल्हा युवा समन्वयक नेहरू युवा केंद्र सांगली) संजय कुरणे (लेखापाल नेहरू युवा केंद्र सांगली) व सागर व्हनमाणे , यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. आज जागतिक पर्यावरण दिवस, जगभरातील सरकार सामाजिक व खाजगी संस्था विविध जाती , धर्म, पंथ, सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले लोक एकत्र येऊन स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर जगामध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धतीने सभा,संमेलने , चर्चासत्राचे आयोजन करून व दिवस साजरा करतात . परंतु या वर्षी जगात कोविड १९ सारख्या जागतिक महामारीला भारत देश पर्यायाने जग ह्या संकटाला सामोरे जात आहे. गेल्या २४ मार्च पासून ते ३० जून पर्यंत शासनाने लॉकडॉऊन ची घोषणा केली आहे . या लॉकडॉऊनच्या काळात नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक राहुल नवले कोविड १९ या जागतिक महामारी विरुध्द कोरोनो योद्धा म्हणून लढा देत आहेत.समाज माध्यमाद्वारे जनजागृती , स्वयंसेवक जोडणे , कोरोनो रुग्णाविषयी असलेले भेदभाव (बदल कर अपना व्यवहार करे कोरोनो पर वार ), प्रशासनाला कोरोनो योद्धा आवश्यक तेव्हा मदत करण्यास तत्पर आहेत तसेच आज पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व संवर्धन करण्या करिता नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून देशभर वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षण करू हा संदेश देण्यात आला. या वेळी युवक मंडळाचे कार्यकर्ते, साहिम तांबोळी, सुभाष नाईकनवरे, सौरभ राक्षे, श्रीशैल खंडके इ. उपस्थित होते.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.