═══════════ ग्रामीण महाराष्ट्र न्यूज ═══════════ फलटण : फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. सकाळचे दिपक मदने व उपाध्यक्षपदी दै. ऐक्यचे सुभाष सोनवलकर, सचिवपदी दै. पुण्यनगरीचे रोहन झांजुर्णे तर खजिनदार व प्रसिद्धीप्रमुख पदी साप्ताहिक स्वराज अँग्रोचे सचिन निंबाळकर यांच्या निवडी करण्यात आली. फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचच नूतन पदाधिकारी निवडीबाबत फलटण येथील माळजाई उद्यान येथे आयोजित सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन आयोजित केलेल्या बैठकीत फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱी निवडी करण्यात आल्या. फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाची पदाधिकारी निवड एक वर्षासाठी पुढिलप्रमाणे करण्यात आली असून अध्यक्ष- दिपक मदने, उपाध्यक्ष- सुभाष सोनवलकर, सचिव - रोहन झांजुर्णे, खजिनदार व प्रसिद्धीप्रमुख सचिन निंबाळकर यांची निवड करण्यात आली. यावेळी नुतन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व प्रसिद्धीप्रमुख यांचा उपस्थित पदाधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष उपाध्यक्ष सुरेश भोईटे यांचा सत्कार करण्यात आला. आगामी कालावधीत राबविण्यात येणार्या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात येवून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. पदाधिकारी निवडीसाठी ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे विभागीय संपर्क प्रमुख श्रीरंग पवार, सातारा जिल्हा अध्यक्ष विनायक शिंदे, माजी अध्यक्ष स.रा.मोहिते, सुरेश भोईटे, सूर्यकांत निंबाळकर, नानासाहेब मुळीक, तानाजी भंडलकर, अशोक सस्ते, संजय जामदार, निलेश सोनवलकर, वैभव गावडे, अजित निकम यांचेसह कार्यकारणी सदस्य व सभासद उपस्थित होते.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.