देवापुर -देशात व राज्यात कोरोना विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा भयानक परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता महावितरण चे कर्मचारी ,अधिकारी वर्ग विद्युत सेवा देत आहे.कोरोनाच्या संकट काळात कोरोना विरूद्ध लढण्यात जोमाने पुढे असणाऱ्या वीज कर्मचारी समुदायाला मदत करण्यासाठी म्हसवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हसवड च्या उपनगराध्यक्षा सौ. स्नेहल युवराज सुर्यवंशी यांच्या हस्ते फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.

.म्हसवडमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री.जयंत पाटील, व जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. बाळासाहेब पाटील,विधान परिषद सभापती मा.ना.श्री. रामराजे नाईक निंबाळकर,आमदार श्री.शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष श्री.सुनील माने, सातारा जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस श्री राजकुमार पाटील, श्री.प्रभाकर घार्गे, श्री.प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या म्हसवड शहर विभाग व देवापुर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षितेसाठी म्हसवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हसवडच्या उपनगराध्यक्षा सौ.स्नेहल युवराज सूर्यवंशी यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना फेस शील्ड चे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अशा परिस्थितीत वीज वितरण कर्मचारी जीवाची पर्वा न करता देत असलेल्या सेवेबद्दल नगराध्यक्षा सौ. स्नेहल सुर्यवंशी यांनी उपस्थितांचे कौतुक केले.यावेळी म्हसवड शहराचे कनिष्ठ अभियंता रोहित तायडे व देवापुर विभागाचे अभियंता श्री. गायकवाड व कर्मचारी यांनी राष्ट्रवादी पक्षाचे आभार मानले.