शौचालय साफ करणाऱ्या कामगारांचा प्रामाणिक पणा, सोन्याचे सापडलेले गंठण केले परत.




──────────────
     ग्रामीण महाराष्ट्र न्युज 
──────────────

 ● म्हसवड प्रतिनिधी   ▬


  ╔═══════   ══════╗
     शौचालय सफाई कामगारांनी
    सोन्याचे गंठण केले परत
  ╚═══════   ══════╝

म्हसवड येथील प्रिन्स एन्वायरमेन्ट सोल्यूशन प्रा लिमिटेड या संस्थेचे वैभव सरतापे हे शौच्छालयाच्या टाक्या मशिनरी द्वारे स्वच्छ करण्याचा व्यवसाय करत असताना सोलापुर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोऴे या गावातील शंकर माने यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मणी मंगळसुत्र शौच्छालयाची टाकी स्वच्छ  करताना सापडले होते.
 ते म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि  गणेश वाघमोडे यांचे हस्ते शंकर माने यांना परत करुन वैभव सरतापे यांनी प्रामाणीक पणे परत करुन समाज्यापुढे एक वेगळा आदर्श ठेवला असल्याचे सपोनि वाघमोडे यांनी सांगीतले.
   सध्याच्या काळात प्रामाणिकपणा लोप पावत चाललेला दिसत आहे. मात्र प्रामाणिक पणा हां नुसता ऐकण्यात येतो प्रत्यक्षात पैशासाठी लोक खुन करताना समाजात दिसतात.
म्हसवड येथील वैभव सरतापे यांचा हा प्रामाणिकपणा  इतरांना नक्कीच प्रेरणादायक ठरणार आहे .
वैभव सरतापे यांचा मशिनद्वारे  शौच्छालयाच्या टाक्या स्वच्छ करण्याचा व्यवसाय असुन त्या निमित्ताने ते  सांगोला ,आटपाडी, माण व खटाव तालुक्यात कामानिमित्त जातात.  गेल्या आठवड्यात त्यांनी सांगोला तालुक्यातील कोळे येथील शंकर माने यांच्या घरातील शौचालयाची टाकी मशिनच्या सहाय्याने साफ केली होती.
त्यानंतर सरतापे आपली शौचालयाची गाड़ी घेऊन म्हसवडला आले . नंतर गाड़ी खाली करण्यासाठी डंपिंग ग्राउंडवर गेले.
येथे टाकी खाली केली व ती टाकी पाण्याने स्वच्छ करत असताना, दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र त्यात सापडले.
ड्रायव्हर राजू खरात व प्रमोद सरतापे यांनी वैभव सरतापे यांना सांगीतले सरतापे यांनी शंकर माने यांचेकडे चौकशी केली असता. माने म्हणाले तो दागीना एक महिण्यापूर्वी पडला होता.
 तो माझ्या पत्नीचा आहे.याबाबत खात्रीसाठी खरेदीची पावती माझ्याकडे आहे. असे म्हटल्यावर खात्रीपटली व दागिना घेऊन जाण्यास सांगीतले.
 म्हसवड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे म्हसवड चे  सपोनि गणेश वाघमोडे यांचे हस्ते  दागिणा माने यांना देण्यात आला.
 यावेळी कुमार सरतापे , अंगुली बनसोडे, शिवदास सरतापे, एल के सरतापे, नारायन सरतापे धनंजय बनसोडे  आदी समाज बांधव उपस्थीत होते .
   
╔═══════   ══════╗
      वृक्ष लावा, पृथ्वी वाचवा.
╚═══════   ══════╝